अखेर सेवा जेष्ठ संवर्ग एक शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट..शिक्षक भारतीची मागणी मान्य

जालना प्रतिनिधी - 
अवघड क्षेत्र बदली-राउंड रद्द करावा अशी मागणी शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी ग्राम विकास  मंत्री, व प्रधान सचिव यांना मागणी केली होती. गेले 3 महिने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे,या प्रक्रियेतील पाच टप्पे पूर्ण झाले असून शेवटचा टप्पा अवघड क्षेत्र बदली राउंड करण्याचे ठरविले आहे. दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने निर्धारित  केलेल्या टीचर मॅनेजमेंट ट्रान्सफर सिस्टीम मार्फत अचानक व्हाट्सअप द्वारे बदली यादी प्रसिद्ध करण्यात आली. सदर यादी मध्ये ५३ वर्षावरील शिक्षकांचा, महिला व विधवा शिक्षिका, गंभीर आजारी, दिव्यांग व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षक आहेत. वास्तविक शासनाच्या प्रचलित बदली धोरणानुसार अशा शिक्षकांना बदलीमध्ये सूट देण्यात आलेली आहे.या पार्श्वभूमीवर सेवा जेष्ठ संवर्ग 1 शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये बदली करणे हा त्यांच्यावर अन्याय होणार आहे. दरम्यान सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय थांबवा अन्यथा शिक्षकभारती राज्यभर आंदोलन असा इशारा शिक्षक भारती कडून देण्यात आलेला होता  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने  आदेश जारी केले आहेत, आता संवर्ग 1 जेष्ठ शिक्षकांना  विशेष बाब म्हणून होकार,नकार देण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.

आमदार कपिल पाटील यांनी याबाबत दिलेले निवेदन..

शासनाने अन्यायग्रस्त संवर्ग एक बांधवांना पुन्हा नव्याने नकार देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षक भारतीचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक दराडे, सरचिटणीस रमेश बदर, कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, माध्यमिक विभाग अध्यक्ष श्री सुरेश कदम, महिला विभाग अध्यक्षा श्रीमती सुचिता वाघमारे, उर्दू विभाग अध्यक्ष गफ्फार शेख, विभागीय पदाधिकारी प्रवीण कोकणे धनंजय काकड यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष विनोद तिळवणे जालना, सतीश नागवे बदनापूर, खुशालराव साबळे भोकरदन, गजानन घोडके जाफराबाद, सदाशिव चोले अंबड, रमेश पवार घनसावंगी, विनायक भिसे परतुर, सतीश राठोड मंठा यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे सर्वश्री मुबारक शेख, संदिपान जाधव, लक्ष्मण जगदाळे, गणेश कुटे, जाकेर शेख, एम.डी. तांबे, विजय गाडेकर, डी. एल.मुळजे, रमेश वनवे, संजय शिंदे, कृष्णा वाघ, संतोष गव्हाड,निंबाजी कड, अंकुश चव्हाण, सच्चिदानंद होनराव, कैलास तिडके, अश्विन गुंजकर, विजय शेडगे, संतोष डोईफोडे, श्रीकृष्ण निहाळ, नारायण हरणे, रमेश मगर, रफी शेख,गणेश गर्जे, बाळासाहेब कावळे, शिवाजी कोल्हे, रहीम शेख, विठ्ठल कान्हेरे यांनी शासनाचे आभार मानले आहेत

Post a Comment

Previous Post Next Post