शालेय राज्य तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या कृष्णा चव्हाण, सलोनी प्रसाद, वैष्णवी बेरडला सुवर्णपदक,सार्थक निमसेला रौप्यपदक

 


     महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नगर:शालेय राज्य तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगर जिल्हा तायक्वांदो संघंटनेची कृष्णा शशिकांत चव्हाण (संगमनेर), सलोनी उमेश प्रसाद (नगर), वैष्णवी नीलेश बेरड (नगर) यांनी सुवर्णपदक, तर सार्थक राजू निमसे (नगर) याने रौप्यपदक पटकाविले आहे. 

    जळगाव येथे राज्य क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्यातर्फे शालेय राज्य तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत या खेळाडूंनी पुणे विभागाचे नेतृत्त्व करत सहभाग नोंदविला होता. जिल्हा, विभागात सुवर्णपदक पटकाविल्यानंतर त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली होती. तीन वर्षांनंतर होत असलेल्या या स्पर्धेत खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. राज्यातील आठ विभागातील प्रत्येक गटामध्ये खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. पहिल्या दिवशी 14, 17 व 19 गटात मुलांच्या स्पर्धा पार पडल्या. यात पुणे विभागाचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या संगमनेरच्या कृष्णा चव्हाणने आपल्या गटात सर्व विभागातील खेळाडूंवर मात करत सुवर्णपदक पटकाविले. तर, सार्थक निमसे याने रौप्यपदक पटकाविले. दुसर्‍या दिवशी झालेल्या मुलींच्या गटात नगरच्या सलोनी प्रसादने सुवर्णपदकाचे खाते उघडत पुणे विभागाला चांगली सुरुवात करून दिली.तिच्या पाठोपाठ नगरच्या वैष्णवी बेरडने मुलींमधील दुसरे सुवर्णपदक पटकाविले. कृष्णा चव्हाण याला प्रशिक्षक लक्ष्मण शिंदे, सलोनी प्रसाद व वैष्णवी बेरडला प्रशिक्षक रवि यादव, गणेश धीवर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून महेश टेमक, लक्ष्मण शिंदे, संदीप तुपे आदींनी काम पाहिले.

    सर्व खेळाडूं व प्रशिकांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, अहमदनगर जिल्हा तायक्वांदोचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, जिल्हा सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकाले, सचिन आगळे, शकील सय्यद, सुरेश वाघ, दिनेश राजपूत,महादेव मगर, अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, महेश मुरादे, संतोष परांडे, बाबा क्षीरसागर, सुरज शिंदे, अक्षय चंदन, विशाल जंजाळ, अक्षय साळुंखे, सागर सानप आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post