वर्धा येथील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंनी पटकावली ६ पदके

सेंन्सर वर पार पडली बालगटाची राज्य तायक्वांदो स्पर्धा 



    तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई आयोजित १४ वर्षाखालील वयोगटातल्या मुला- मुलींची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पुलगाव, जिल्हा वर्धा या ठिकाणी पार पडली. बालगटाची राज्य तायक्वांदो स्पर्धा प्रथमच अत्याधुनिक सेंन्सर सिस्टिम ( संगणक प्रणाली) वर पार पडली. या स्पर्धेमध्ये बीड जिल्हा संघातील खेळाडू श्रवण तांबारे व सार्थक भाकरे यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारून २ रौप्यपदके जिंकली. यशस्वी चव्हाण, सृष्टी कौशल्ये, ओंकार परदेशी व नेहा आंधळे (वडवणी) यांनी ४ कांस्यपदके जिंकली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, धुलीचंद मेश्राम, तांत्रिक समितीचे प्रमुख तथा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित प्रवीण बोरसे, वर्धा न्यायालयाचे न्यायाधीश डोईफोडे,  आयोजक सतीश खेमसकर , अजित घारगे यांच्या हस्ते करण्यात आले. बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या सृष्टी योगे, सलोनी जौंजाळ, प्रेरणा माळगे, कार्तिकी मिसाळ, अभिषेक आमटे, स्वराज घोडके, रूद्र पिंपळे, प्रथम इंगळे, यशराज मुंडे यांनी या राज्य स्पर्धेत सहभाग नोंदविला. बीड संघ प्रशिक्षक म्हणून अनिस शेख, पारस गुरखुदे, देवेंद्र जोशी यांनी तर व्यवस्थापक म्हणून नितिन आंधळे, पंच म्हणून बाळासाहेब आंधळे यांनी काम पाहिले. हे सर्व खेळाडू बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे डॉ अविनाश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात सराव करत आहेत. 
    नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण, क्रीडा अधिकारी महेश खुटाळे , योगेश करांडे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. राजेश क्षीरसागर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे , भारत पांचाळ, महीला प्रशिक्षीका जया बारगजे, बन्सी राऊत, मनीश बनकर, डॉ. विनोदचंद्र पवार,  प्रा. पी टी चव्हाण, सुनील राऊत, श्रीकांत पाटील, प्रसाद साहू, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, अविनाश पांचाळ, नवीद शेख, सचिन जायभाये, डॉ. शकील शेख, उज्वल गायकवाड, नितीन आंधळे, बालाजी कराड, अमित मोरे, सचिन कातांगळे, शुभम खिल्लारे, कृष्णा उगलमुगले, सुशांत सोन्नर, सुरज देशमुख आदींनी पदक विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post