लोणी येथे होणार 12 मार्चला जिल्हा सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
लोणी तालुका राहता येथे येत्या रविवारी १२ मार्च रोजी, जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांनी दिली. 
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या राज्य संघटनेच्या आधिपत्याखाली रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोशिएशनच्या वतीने डेरवण संकुल, रत्नागिरी येथे १६,१७ व १८ मार्च २०२३ रोजी
राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे लोणी येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी ०१/०१/,२०११ ते ३१/१२/२०१४ दरम्यान जन्मतारीख असणे बंधनकारक आहे. स्पर्धेचे यजमानपद राहता तालुका तायक्वांदो असोसिएशनकडे देण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत खेळाडूंचे वजन व नोंदणी केली जाईल. त्यानंतर स्पर्धेत सुरुवात होईल, तरी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी याची नोंद घ्यावी. स्पर्धेमध्ये प्रत्येकाने जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी करावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post