मानधन वाढ आणि पेन्शन योजनेबाबत दिलेल्या आश्वासनांचा विचार करून आम्ही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. : एम.ए.पाटील राज्य अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघ


अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ, संप मागे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
     राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानभवनात अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा अंगणवाडी कर्मचारी संघाने केली.
   मानधन वाढ, पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला होता. अंगणवाड्या बंद असल्याने सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होती. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, बालकांचे लसीकरण,. कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही संपाचा प्रतिकूल परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवले होते. या बैठकीत मानधन वाढीसह पेन्शन योजना आणि इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. मानधन वाढविण्याबरोबर अंगणवाडी सेविकांसाठी १५ दिवसांत पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नको वेतन हवे, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन, व नियमानुसार ग्रॅच्युईटी मिळावी,  अंगणवाडी सेविकांना कार्यक्षम मोबाईल देण्यात यावेत व त्यांच्या वैयक्तीक मोबाईलवर माहिती भरण्याची सक्ती करु नये व पोषण ट्रॅकर अॅप संपूर्णपणे मराठी भाषेत देण्यात यावे. सेवानिवृत्त व मृत पावलेल्या कर्मचा-यांचे थकित सेवासमाप्ती लाभ विनाविलंब द्यावेत,  अश्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती, अंगणवाडी कर्मचारी संघटना, जनशक्ती, यांनी संपुर्ण महाराष्ट्रात पुकारलेल्या अंदोलनात सहभागी होत जामखेड येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती, अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या जामखेड शाखा तसेच जामखेड तालुक्यातील साईश्रध्दा कृती समीतीच्या वतीने तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती जामखेड शाखेच्या तालुका अध्यक्षा पुजा अनिल गाडेकर, सचिव इंदूबाई थोरात तसेच शैला आबा सदाफुले, सुरेखा शिंदे, शितल जायभय, शुभांगी राऊत, तर साईश्रध्दा कृती समीती जामखेड तालुका या संघटनेच्या तालुका अध्यक्षा सविता रावसाहेब ढवळे, सचिव आयशा अखिल शेख तसेच अर्चना संदिप खर्डे, संगीता विजय सुरवसे, संगीता अभिमान गायकवाड, यास्मीन अहमद खुरसान यांच्यासह तालुक्यातील सर्वच ४०० आंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या अंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच जामखेड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालया समोर करण्यात आलेल्या अंदोलनावेळीही सर्व संघटनांच्या आंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. 
         या बाबत दि. २७ फेब्रुवारी रोजी जामखेड येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन या अंदोलनाची सुरूवात करण्यात आली. यानंतर जामखेड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत सर्व संघटनांच्या पदाधिकारी व सभासद आंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी लाक्षणिक अंदोलन करून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. यावेळी आंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सरकार विरोधी दिलेल्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

Previous Post Next Post