महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुली सध्या तायक्वांदो या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. मुलींचा आत्मविश्वास वाढण्यासाठी व त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शासनाचा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे. ग्रामीण भागातील मुलींना याचा भविष्यात निश्चितच फायदा होईल.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
त्याप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम सध्या सुरू आहे. तालुक्यातील घाटशिरस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुली मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत. शाळेचे
मुख्याध्यापक मच्छिंद्र थोरात , मिनीनाथ शिंदे पदवीधर शिक्षक, प्रविण तुपे पदवीधर शिक्षक, एकनाथ गुंजाळ पदवीधर शिक्षक, सौ, सुरेखा जाधव , राहुल शेलार, सुनील पदमने, सौ, अर्चना बोराडे, सौ, रंजना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदो प्रशिक्षक गोरक्षनाथ गालम हे तायक्वांदो प्रशिक्षण घेत आहेत. त्यामध्ये मुली उस्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे मुलींना व्यायामाची आवड निर्माण होत आहे.