13 दिवसांनी गोपीनाथ राऊत सुखरूप घरी परतले, शोध मोहिमेत सहकार्य केलेल्यांचे राऊत कुटुंबीयांच्या वतीने आभार


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
   तेरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर श्री.गोपीनाथ बाबुराव राऊत हे जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आज दिनांक 19 एप्रिल रोजी सापडले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बीड येथील घरी परत आणले. 

   बीड शहरातील रहिवासी श्री. गोपीनाथ बाबूराव राऊत हे त्रिमूर्ती कॉलनी नंबर 2 दत्तनगर ए. एस. के. कॉलेज रोड बीड येथून 6 एप्रिल 2023 सकाळी 8:00 वाजल्यापासून निघून गेले होते. त्यांना स्मृतीभ्रंश हा आजार असल्याने संपूर्ण कुटुंबाला त्यांची काळजी वाटत होती. त्यातच त्यांना रक्तदाब व शुगरच्या गोळ्या सुरु आहेत. घरातून बाहेर पडताना त्यांनी कोणत्या कोणत्याही वस्तू मोबाईल चष्मा इत्यादी व औषधे सोबत नेले नव्हते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्यांची काळजी वाटत होती. 6 एप्रिल पासून राऊत कुटुंबीयांनी व त्यांच्या नातेवाईक त्याचबरोबर जवळच्या मित्रांनी शोध मोहीम सुरू केली होती. जवळपास संपूर्ण बीड जिल्हा त्याचबरोबर जामखेड, पाथर्डी उस्मानाबाद आळंदी आदी ठिकाणे त्यांनी पिंजून काढला होता. 
    बुधवारी दिनांक 19 एप्रिल रोजी त्यांना अशक्तपणा आल्याच्या कारणावरून एका त्रयस्थ व्यक्तीने जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले होते. तेथून माहिती कळताच त्यांचे जेष्ठ चिरंजीव श्री सुनील राऊत व त्यांचे कुटुंबीय यांनी जालन्याकडे धाव घेतली व तेथून त्यांना बीडला सुखरूप आणण्यात आले. बीड येथील त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे त्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार घेण्यात येत आहेत.
नातेवाईक व जवळचे मित्रपरिवार व इतर अनेक नागरिकांनी श्री. गोपीनाथ राऊत यांना शोधण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली. त्या सर्वांचे सुनील राऊत, गणेश राऊत, महेश राऊत, दुर्गेश राऊत व राऊत कुटुंबीयांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात येत आहेत. 


Post a Comment

Previous Post Next Post