विजेत्यास ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात आज मातीतील अंतिम कुस्ती होणार असून, मॅटवरील अंतिम सामन्यातील विजेत्याबरोबर सोनेरी गाडीसाठी अंतिम लढत होईल. भाजपा शिवसेना युती व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने अहमदनगर येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ उद्या दि.२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लास ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजापाचे शहर जिल्हाध्यक्ष व संयोजन समितीचे महेंद्र गंधे यांनी दिली.
आज झालेल्या सेमी फायनलच्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख यांनी शैलेश शेळके याच्यावर 8-1 अशी मात करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर, दुसऱ्या सेमी फायनल मध्ये हर्षवर्धन सदगीर जखमी झाल्याने रविवारी सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे.
छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामने 65 किलो आबा आटकळे सोलापूर विरुद्ध सुरज देवकर सोलापूर सुरज कोकाटे पुणे पंकज पाटील सांगली 70 किलो सोनबा गंगावने कोल्हापूर विरुद्ध सद्दाम शेख कोल्हापूर, रोहित आजबे नगर, विरुद्ध निखिल कदम पुणे 74 किलो अनिल कचरे पुणे विरुद्ध जतिन आव्हाळे धुळे सुरज तनपुरे अहमदनगर अक्षय चव्हाण पुणे 79 किलो अंकुश माने सांगली विरुद्ध अविनाश शिंदे बीड माधव कचरे सोलापूर विरुद्ध प्रकाश काळे सोलापूर 86 किलो राहुल काळे सोलापूर विरुद्ध कौतुक डफळे कोल्हापूर चंद्रशेखर गवळी धुळे विरुद्ध एकनाथ बेद्रे सोलापूर 86 ते 125 किलो शिकंदर शेख वाशिम विरुद्ध शैलेश शेळके लातूर हर्षवर्धन सदगीर नाशिक महेंद्र गायकवाड सोलापूर.
या उपांत्य फेरी सामन्यातून विजयी झालेले मल्ल पुढीलप्रमाणे आबा आटकळे सोलापूर, सुरेश कोकाटे पुणे, सोनबा गंगावणे कोल्हापूर, निखिल कदम पुणे, अनिल कचरे पुणे, अक्षय चव्हाण पुणे, अंकुश माने सांगली, माधव कचरे सोलापूर, राहुल काळे सोलापूर, सिकंदर शेख वाशिम
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार सदाशिव लोखंडे आदींसह स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आ.राम शिंदे व जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेतील अंतिम कुस्ती ही बेमुदत पद्धतीने माती विभागात होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे सचिन जाधव यांनी दिली.
स्पर्धेतील विजेत्या मल्ल्लास ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा देण्यात येणार आहे. ही सोन्याची गदा केवळ १५ दिवसात नगरमध्येच तयार करण्यात आली आहे. यासाठी अहमदनगर गोल्ड क्लस्टर व लोळगे ज्वेलर्सचे १४ कर्मचारी अहोरत्र काम करत होते. अत्यंत बारीक कोरीव काम असलेली ही गदा पितळी असून त्यावर अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पत्र्याचा मुलामा देण्यात आला आहे. यासाठी खास जयपूरहून कारागीर नगरला आले होते, अशी माहिती अहमदनगर गोल्ड क्लस्टरचे प्रकाश लोळगे यांनी दिली.
सर्व छायाचित्र सिद्धार्थ दीक्षित अहमदनगर