अमोल शेंडगे यांना उत्कृष्ट कालवा निरीक्षक पुरस्कार प्रदान



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
   अमोल शेंडगे यांना सन 2022-2023 चा उत्कृष्ट कालवा निरीक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 

    जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्यालय,नाशिक च्यावतीने "उत्कृष्ट कालवा निरीक्षक पुरस्कार सन 2022-2023" सन्माननीय मुख्य अभियंता इंजि.श्री. पी. बी. मिसाळ साहेब यांच्या शुभहस्ते दि.२१/०४/२०२३ रोजी  बोट क्लब शेजारी,MTDC,नाशिक,याठिकाणी कालवा निरीक्षक श्री.अमोल साहेबराव शेंडगे भाऊसाहेब मुसळवाडी सिंचन शाखा कार्यालय क.2,मुसळवाडी यांना देण्यात आलेला आहे. यावेळी  मा.अधिक्षक अभियंता व प्रशासक,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालय, नाशिक श्री.सागर ज्ञा.शिंदे साहेब,अहमदनगर पाटबंधारे विभाग, अ.नगर, मा.कार्यकारी अभियंता श्री.जी.बी.नन्नोर साहेब,मुळा पाटबंधारे विभाग, अ.नगर, मा.कार्यकारी अभियंता,कु.सायली पाटील मँडम,अकोले पाटबंधारे उपविभाग, अकोले,मा.उपविभागीय अधिकारी श्री.वाय.बी र्जोवेकर साहेब व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post