तुळशीराम सानप यांच्या मागणीमुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राज्यमार्ग, प्रजिमामार्ग , इजीमामार्ग, ग्रामीणमार्ग, मंजूर


   
पाथर्डी :-
  पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील राज्यमार्ग, प्रजिमामार्ग , इजीमामार्ग, ग्रामीणमार्ग, मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात मंजूर करणे बाबतची मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप रा. कुत्तरवाडी ता. पाथर्डी यांनी दि.१८/१०/२०२२ रोजी आमदार श्रीकांत भारतीय  यांना निवेदन देऊन केली होती. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, यांच्याकडे हे निवेदन पाठवले. 

त्यानुसार श्री. सानप यांची मागणी प्रधान सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांनी मंजूर केली. त्यानुसार मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात खालील प्रमाणे नमूद केलेली कामे मंजूर झाली आहेत.
 १)हायब्रीड अन्युईटी अंतर्गत
 ‌   १)राज्यमार्ग क्रमांक   ५०मौजे भायगाव ,शेवगाव, बोधेगाव बालमटाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर,६१कोटी ५० लक्ष रुपये, २)राज्यमार्ग क्रमांक ६१मौजे तिसगाव, कासार पिंपळगाव अमरापुर शेवगाव  क-हेटाकळी ता  शेवगाव जिल्हा अहमदनगर ५२ कोटी २५ लक्ष रुपये,३)राज्यमार्ग क्रमांक ५२ मौजे पांढरीपूल,  मिरी माका, ढोरजळगाव, शेवगाव  तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ५३ कोटी २५ लक्ष रुपये ,या मार्गास  हायब्रीड अन्युईटी अंतर्गत  मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असून या मार्गाच्या डांबरीकरणाचे रुंदीकरण कामकाज १०मीटर होणार आहे.
 २) पाथर्डी तालुका प्रजिमा मार्ग
१)प्रजिमा ३९ कोरडगाव ते बोधेगाव पूल व रस्ता  २ कोटी रुपये, २)प्रजिमा १६५ तोंडोळी ते जिरेवाडी पूल व रस्ता २ कोटी ५०लक्ष रूपये, ३)प्रजिमा १६३ मिरी ते कासार पिंपळगाव २ कोटी  रुपये, ४)प्रजिमा १६४  सुसरे ते आगसखांड  पूल व रस्ता ७ कोटी रुपये, ५)प्रजिमा १६२पाथर्डी ते दुलेचांदगाव २कोटी २५ लक्ष रुपये, ६)प्रजिमा ३० ढोरजळगाव ते कोरडगाव २ कोटी ५०लक्ष रुपये ,७) प्रजिमा ४७ चिंचपूर इजदे ते जोगेवाडी २कोटी ५०लक्ष रुपये, ८)प्रजिमा १६२ पाथर्डी ते मढी २ कोटी रुपये, ९)प्रजिमा ४६ पाथर्डी ते मोहरी ३ कोटी रुपये पूर्वीचे २ कोटी रुपये एकूण ५कोटी रुपये,१०) प्रजिमा १६४सुसरे ते आगसखांड ३ कोटी५०लक्ष रुपये,
 ३) शेवगाव तालुका प्रजिमा मार्ग
१)प्रजिमा १५८ गणपती आव्हाणे ते  भगूर २ कोटी ७५लक्ष रुपये,२) प्रजिमा १५९ खुंटेफळ ते ताजनापुर ५ कोटी रुपये ,३) प्रजिमा ३० भातकुडगाव , ढोरजळगाव   २ कोटी५०लक्ष रुपये, ४)प्रजिमा १६४ वरूर ते आगसखांड २कोटी ५०लक्ष रूपये, ५)प्रजिमा १६६ मळेगाव ते रांजणी २ कोटी रुपये, ६)प्रजिमा ३८शेवगाव , आखेगाव  २ कोटी रुपये,७) प्रजिमा १६० प्रभू वडगाव ते मुंगी २ कोटी ५० लक्ष रुपये, ८)प्रजिमा खानापूर ते ठाकूर निमगाव २ कोटी रुपये,
 ४ )राज्यमार्गक्रमांक ६१ विशेष दुरुस्ती २ कोटी ५० लक्ष रुपये.
 ५) पाथर्डी तालुका इजीमा मार्ग,व ग्रामीण मार्ग, 
१)इजीमा१९२ चिंचपूर पांगुळ ते वडगाव वाघेश्वरी वस्ती ४० लक्ष रुपये, २)इजीमा १९२ मानेवाडी ते चिंचपूर पांगुळ ९०लक्ष रुपये, ३)ग्रामीण मार्ग ४३ माणिकदौंडी ते लांडकवाडी ९० लक्ष रुपये,
४)ग्रामीण मार्ग ५४ मोहरी भांडेवाडी मोहट देवी ८० लक्ष रुपये,
 ५)ग्रा.मा ५२ धनगरवाडी, हरीचा तांडा ८० लक्ष रुपये,
 ६)कुत्तरवाडी ग्रा.मा ९४ पांगरा फाटा ३० लाख रुपये, ७)ग्रामीण मार्ग २०८ मीडसांगवी ३० लाख रुपये,
८)ग्रामीण मार्ग ३० अकोले ३० लक्ष रुपये, 
९)ग्रा.मा २३ तुळजवाडी ते दैत्य नांदूर १ कोटी ५० लक्ष रुपये,
१०) आल्हणवाडी  ग्रामीण मार्ग ९० करिता ३० लक्ष रुपये,
 *६(*शेवगाव तालुका ग्रामीण* *मार्ग** *व* *इजीमा मार्ग,*
१)इजीमा मार्ग १८७ अधोडी ६०लक्ष रुपये, २)ग्रा.मा १४८
 शहरटाकळी ते डोळ वस्ती ५० लक्ष रुपये, ३)इजीमा ८५ शिंगोरी ते थाटे १ कोटी २५लक्ष रुपये, ४)इजीमा ८५ सालेवडगाव ते मुर्शदपुर
१कोटी ५० लक्ष रुपये, ५)ग्रा.मा २३ ठाकूर निमगाव ८० लक्ष रुपये.
६) इजीमा ८३ खडका, मडका ,३०लाख रुपये
  मौजे कुत्तरवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ते मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या १८ किमी अंतराच्या मार्गाचे डांबरीकरण कामकाज २५ फूट रुंदीकरण प्रस्ताव
 येत्या अर्थसंकल्पात मंजूर करून अहमदनगर ते बीड जवळपास १३०कि.मी अंतराचा नवीन मार्ग होणार असून पाथर्डी तालुक्यातील ५०
गावांचा तसेच आष्टी तालुक्यातील 30 गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.
  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार श्रीकांत भारतीय, तसेच तुळशीराम सानप यांच्या पाठपुराव्याला  यश आले असून यांचे अहमदनगर जिल्ह्यातील जनतेकडून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post