तायक्वांदो बेल्ट परीक्षेत जामखेडच्या खेळाडूंचे यश


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड येथील तायक्वांदो खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत यश संपादन केले असून अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने त्यांना बेल्ट व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 

अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशियन व जामखेड अकॅडमी च्या वतीने जामखेड येथे सुरू असलेले प्रशिक्षण वर्ग बाजारतळ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराततील प्रांगणात तायक्वांदो खेळाडूंच्या कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सहसचिव अल्ताफ कडकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. यावेळी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे उपस्थित होते. या बेल्ट परीक्षेत पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. 

ब्ल्यू बेल्ट - जयश्री बेरड, तनुश्री वारभोग, सिद्धी सांगळे ग्रीन वन बेल्ट - सानिका नागरगोजे, महिमा वारभोग, अमर आंधळे ग्रीन बेल्ट - नसीमा पठाण, शार्मीन पठाण येलो बेल्ट - जयवर्धन बेरड, आदर्श घायतडक, समाधान सदाफुले, रुद्र सोनार या सर्व खेळाडूंना संघटनेच्या वतीने बेल्ट व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पत्रकार संजय वारभोग तायक्वांदो प्रशिक्षक तथा जिल्हा संघटनेचे सचिव संतोष बारगजे, सौ सविता बारगजे उपस्थित होते. या सर्व खेळाडूंचे अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, सहसचिव अल्ताफ कडकाले, दत्तात्रय उदारे सर संजय बेरड आदींनी अभिनंदन केले.


Post a Comment

Previous Post Next Post