बाजार समिती निवडणुकीत प्रा.सचिन गायवळ यांचा आ. राम शिंदे यांना जाहीर पाठिंबा


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीसाठी प्रा.सचिन गायवळ यांनी आ. प्रा. राम शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता भाजपची ताकद वाढली आहे. 
 
  प्रा. सचिन गायवळ यांनी जामखेड तालुक्यातील  समर्थकांसोबत चर्चा केली त्यानंतर सर्वानुमते भारतीय जनता पार्टिच्या विचारधारेसोबत स्वभिमानाचं आणि सन्मानाचं राजकारण करण्यासाठी आ. शिंदे याच काम करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित समर्थकांमध्ये तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा चेअरमन, सोसायटी संचालक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. 
   प्रा. सचिन सर गायवळ यांच्या समर्थकांमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे तालुक्यात त्यांच्या समर्थकांची  संख्या मोठी आहे. आणि आज सगळ्याच समर्थकांनी प्रा सचिन गायवळ सर यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांचीही चिंता वाढणार आहे. प्रा. गायवळ यांच्या पाठींब्याने जामखेड तालुक्यात भारतीय जनता पार्टिची ताकद वाढणार असुन बाजार समिती निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार आहे. प्रा. गायवळ यांच्या भुमिकेमुळे जामखेड तालुक्यातील राजकारणात नवीन चैतन्य निर्माण झाले आहे 
प्रा. गायवळ यांच्या प्राध्यापक, समाजसेवक आणि आता राजकारण या प्रवासाने राजकीय क्षेत्रातील युवा वर्गाला आ. राम शिंदे यांच्या बरोबरच हक्काच दुसरं स्थानिक नेतृत्व मिळणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रा. गायवळ यांच्याकडुन सर्व समर्थकांना एकविचाराने एकत्र येऊन भविष्यात स्वभिमानाचं, सन्मानाच, आणि समाजहिताचं राजकारण करण्याचं सांगण्यात आलं.

Post a Comment

Previous Post Next Post