महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिऊर या ठिकाणी आज शुक्रवार दि. 21 एप्रिल रोजी इयत्ता-सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिऊरच्या सरपंच मा. सौ.गिरिजाताई उतेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ तनपुरे तसेच गावचे पोलीस पाटील श्री. अमोल गायकवाड आणि शाळा व्यवस्थापन समितीचे. उपाध्यक्ष हनुमंत माने, नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संतोषकुमार वांढरे साहेब तसेच पालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली.
निरोप समारंभातील कार्यक्रमांमध्ये इयत्ता-सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी भावुक मनाने मनोगत व्यक्त केले. यामध्ये सात वर्षात आलेले अनुभव, शिक्षकांनी घेतलेले कष्ट, सहल, सांस्कृतिक कार्यक्रम-स्नेहसंमेलन (ग्यादरिंग), क्षेत्रभेट, शाळेतील विविध उपक्रम यामध्ये केलेली मज्जा तसेच आलेले अनुभव, शाळेतील शिस्त,अभ्यास, केलेल्या खोड्या सर्व गोष्टींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री वांडरे सर यांनी केले. अध्यक्षीय सूचना श्री. गर्जे सर यांनी मांडली व त्यास श्री. शेलार सर यांनी अनुमोदन दिले. श्रीम. मासाळकर मॅडम आणि श्रीम. सोनवणे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार श्रीम. काळे मॅडम यांनी मानले.
शेवटी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पुरी,भाजी,भात,गुलाब जामुन इत्यादी स्नेहभोजनांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
ad⤵️
Tags
शैक्षणिक