महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भाजप व सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती स्पर्धांचे नगरमध्ये झालेल्या आयोजनाचे मला अभिमान वाटत आहे. येथे युतीचे दोन्ही झेंडे डौलात फडकत आहेत. युतीचे उत्कृष्ट प्रदर्शन येथे होत आहे. कुस्ती हा खेळ भारतात पुरातन काळापासून खेळला जात आहे. करोनाच्या संकटांनंतर व मोबाईलच्या आक्रमणातही कुस्ती महत्व अबाधित आहे. नुकत्याच पुण्यात भव्य स्पर्धा झाल्या. त्यापाठोपाठ नगरमध्येही हि भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. आम्ही राजकारणातही कुस्ती मधील अनेक डावपेचांचा वापर कायम करत आहोत. महाराष्ट्रात कुस्तीत जो प्रथम आला त्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलीस खात्यात घेतेले. आता नगर मध्येही मोठी स्पर्धा होत आहे. येथे प्रथमच सोन्याची एव्हडी मोठी गदा देणार असल्याचा अभिमान मला वाटत आहे. जो कुस्तीगीर ही गदा जिंकेल त्यालाही पोलीस खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली पाहिजे अशी मागणी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सध्याचे राज्यातील युतीच्या सरकारने क्रीडा क्षेत्राल प्रोत्साहन देण्यासाठी बजेट मध्ये निधी वाढवला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून ‘छोटीसी मुसिबतसे घाबरा जाये वो अनाडी होता है | हार को सामने देखकर जो लढता है वो खिलाडी होता है |’ असा संदेश त्यांनी सहभागी कुस्तीगीरांना देत म्हणाले, यावर्षी स्पर्धेच्या विजेत्यास अर्धा किलोची गदा दिली आहे. पुढीलवर्षी विखे पितापुत्र यात भर घालून एक किलोची गदा देतील. राज्याच्या भल्यासाठी ही युती कायम ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.
भाजप सेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, भाजपाचे संघटन मंत्री विजय चौधरी, खा.सुजय विखे, आ.बबनराव पाचपुते, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संयोजन समितीचे वसंत लोढा, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदास बेरड आदींसह मोठ्या संख्येने युतीचे पदाधिकारी व कुस्ती शौकीन नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी तुतारी व हलगीच्या तालात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर आ.चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह मान्यवरांनी आखाड्यास प्रदक्षिणा मारून नागरिकांना अभिवादन केले. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यास देण्यात येणारी अर्धा किलोची सोन्याची गदेचे अनावरण करण्यात आले.
मंत्री विखे म्हणाले, कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी कोणतीही महत्त्वकांक्षा न ठेवता एव्हड्या मोठ्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद आहे. नगर जिल्ह्याला कुस्तीची मोठी वैभवशाली परंपरा आहे. ती जपली जात आहे. कुस्तीला सरकारने अजून पाठबळ द्यावे. स्पर्धेत सहभागी झालेल्या मल्लांना ही स्पर्धा लाभदायी ठरो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक वसंत लोढा यांनी केले. दिलीप सातपुते यांनी स्वागत केले. सचिन पारखी यांनी आभार मानले.
भाजप सेना युतीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेचे उद्घाटन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे. समवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, आ.बबनराव पाचपुते, विजय चौधरी, अभय आगरकर, वसंत लोढा, अनिल शिंदे, सुवेन्द्र गांधी आदी
सर्व छायाचित्र – सिद्धार्थ दीक्षित