महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथील रहिवासी व पिंपरी चिंचवडच येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ.काकासाहेब डोळे यांना DG's Insignia 2022 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. काकासाहेब डोळे हे पोलीस दलातील एक अभ्यासू अधिकारी स्वच्छ प्रतिमा आणि उल्लेखनीय कामासाठी त्यांचा नावलौकिक आहे. पोलीस खात्यात त्यांनी आज तागायत सेवा केलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांची कामगिरी उल्लेखनी राहिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे त्यांना DG's Insignia 2022 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डाॅ. काकासाहेब डोळे हे मुळचे डोळेवाडी ता. जामखेड जि. अहमदनगर येथील रहिवासी . डॉ. काकासाहेब डोळे हे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता तल्लक बुद्धी, कुशल वक्तृत्व व अभ्यासू व्यक्तिमत्व असे निरनिराळे पैलू त्यांच्या मध्ये ठळकपणे पाहायला मिळतात. मागे वळून पाहिले असता डॉ. काकासाहेब डोळे हे ग्रामीण भागातून पुढे गेलेले व्यक्तीमत्व आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदिनाथ भगवानराव डोळे यांचे ते चिरंजीव तर मुंजेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक विक्रम डोळे यांचे ते बंधू होत.
डॉ. काकासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण नागलवाडी - सांगवी ता. आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी तर माध्यमिक शिक्षण टाकळसिंग (ता. आष्टी जिल्हा बीड) या ठिकाणी पूर्ण केले . उच्च माध्यमिक शिक्षण प्रवारानगर ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथून पूर्ण केल्यानंतर व्हीटरनरीला बैल घोडा कॉलेज परेल ; मुंबई येथे ते दाखल झाले . त्यानंतर एमव्हीएससी अकोले येथून पूर्ण केले . पशुधन विकास अधिकारी म्हणून काही वर्षै डॉक्टर काकासाहेब डोळे यांनी सेवा केली . तदनंतर राज्यसेवा परिक्षेच्या माध्यमातून पोलीस उपाधीक्षक पदावर त्यांची निवड झाली, तदनंतर यवतमाळ, बीड , लातूर या जिल्ह्यात निरनिराळ्या पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली . सध्या डॉ. काकासाहेब डोळे हे पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.पोलीस दलामध्ये स्वच्छ प्रतिमेचा शिस्तबद्ध व ॲक्टिव्ह पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे म्हणूनच त्यांना DG Insignia पुरस्कार करण्यात आला आहे. या निमित्ताने बीड व अहमदनगर जिल्ह्यातून व डोळेवाडी राजुरी व जामखेड तालुक्यातील डॉ. काकासाहेब ढवळे यांच्यावर समाजाच्या विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags
जामखेड