महाराष्ट्र दिन व कामगार दिन दिनानिमित्त एक मे रोजी सकाळी, त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे पदाधिकारी व शिवनेरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिर परिसर स्वच्छ केला.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त एक मे रोजी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवण्याची संकल्पना कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या मनात होती. दोन दिवस अगोदर त्यांना श्रीनागेश्वर मंदिर येथे साफसफाई करण्याची कल्पना सुचली. जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे भक्तांची सारखी वर्दळ असते, एक मे निमित्त येथे साफसफाई करायची करावी, असे त्यांच्या मनात आले. त्यानंतर त्यांनी श्रीनागेश्वर सेवा मंडळाशी संपर्क साधला. त्रिदल समिती आजी-माजी सैनिक संघाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्याच बरोबर शिवनेरी अकॅडमी या संस्थेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल महत्व लक्षात यावे. त्याचबरोबर आपले घर आपले ग्रामदैवत आपले गाव स्वच्छ रहावे ही संकल्पना त्यांच्या मनात रुजावी या हेतूने शिवनेरी अकॅडमी च्या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कॅप्टन श्री भोरे सकाळी सहा वाजता श्रीनागेश्वर मंदिर येथे दाखल झाले. स्वतः हातात खराटा घेऊन स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून देण्याचे काम केले. मंदिराच्या आजूबाजूला पडलेला सर्व कचरा, संपूर्ण परिसर बगीच्या वगैरे सर्व त्यांनी साफ केले.
या सामाजिक उपक्रमामध्ये त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे पदाधिकारी व शिवनेरी अकॅडमी चे विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे, उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, कोषाध्यक्ष राजकुमार भराटे, संघ मार्गदर्शक अरविंद जाधव, संचालक पोपट सांगळे, फिजिकल ट्रेनर विजय नागरगोजे व आदी सैनिक व शिवनेरी अकॅडमी चे विद्यार्थी उपस्थित होते
या कामी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे व सेवक महादेव पानसांडे यांनी सहकार्य केले.
ad⤵️
Tags
जामखेड
