जामखेड मध्ये प्रथमच सर्व धर्मासाठी शतावधान

 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
    जामखेड शहरांमध्ये प्रथमच सर्व धर्मीयांसाठी सर्व धर्मासाठी  शतावधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी यांनी दिली

   कोटा संघ प्रमुख परमपूज्य श्री प्रतिभाजी म.सा. यांच्या लहान भगिनी आयंबील आराधिका परमपूज्य श्री प्रफुल्लाजी म.सा. यांच्या सुशीष्या परमपूज्य गरिमाजी म.सा. आणि मुमुक्षु मोक्षाजी चोपडा यांच्या उत्कृष्ट साधनाने अद्भुत स्मरण प्राप्त शक्तीच्या प्रती जनमानसामध्ये श्रद्धा भाव जागृत करणे यास शतावधान म्हणतात. 

   अद्भुत स्मरणशक्ती चा चमत्कार जैन धर्म कडून शत म्हणजे शंभर प्रश्न लक्षात ठेवणे विचारलेल्या प्रश्नांचे नियमित क्रमाने उत्तर देणे आत्म्यामध्ये व्याप्त असंख्यशक्तीने अकलपनीय द्वारा प्रश्नाचे उत्तर देणे माता सरस्वतीची साधना एवन गुरुकृपा च्या प्राप्त अध्यात्मिक अद्भुत शक्तीचे चष्मदित साक्ष बनण्याचा प्रसंग शतावधान मध्ये उपस्थित जनसमुदाय द्वारा विचारल्या गेल्याचे प्रश्नाचे उत्तर साध्वी परमपूज्य गरिमा जी म.सा. आणि मोक्षा चोपडा यांचे कडून होणार आहे. 

   या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील , शांतीलाल गुगळे ,अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी, उमेश देशमुख, डॉ. सुरेश काशीद ,डॉ. प्रताप गायकवाड जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नाशिर पठाण, विश्वदर्शन नेटवर्कचे गुलाब जांभळे कॅप्टन लक्ष्मण भोरे आदी उपस्थित राहणार आहेत
   या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन वर्धमान श्रावक संघ जामखेड, धर्मोदय एकता मंच ,जय गुरु गणेश मंडळ ,आनंद बहु मंडळ, कन्या मंडळ आदींनी केले असून हा कार्यक्रम ३मे २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ जामखेड जैन स्थानकात होणार आहे तसेच कार्यक्रमानंतर जैन श्रावक संघामार्फत गौतम प्रसादी ठेवलेली आहे तरी सर्व जैन धर्मियांनी अथवा ज्या कोणास भाग घ्यावयाचा असेल त्यांनी सकाळी ठीक ९:००वाजता जैन स्थानक जामखेड़ मध्ये हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमा साठी ललित लखीचंद बाफना आणि अमोल किसनलाल तातेड यांच्याकडे संपर्क साधावा.

ad⤵️

Post a Comment

Previous Post Next Post