औरंगाबाद येथे 28 मे रोजी ब्लॅक बेल्ट परीक्षा
रत्नागिरी : रत्नागिरी येथे लवकरच राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले जाईल आणि पुन्हा तुम्हाला रत्नागिरीत बोलाविणार ,अशी ग्वाही राज्यमंत्री उदय सावंत यांनी दिली. राष्ट्रीय पंच परीक्षेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
रत्नागिरी येथील शिवाजी क्रीडा संकूलच्या बॅडमिंटन हॉल येथे शासनमान्य अधिकृत असलेल्या तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ' ताम ' व रत्नागिरी ताइक्वांदो असोसिएशनतर्फे आयोजित राष्ट्रीय पंच परीक्षेमध्ये राज्यभरातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय पंच परीक्षेच्या वेळी राज्यमंत्री उदय सामंत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी रत्नागिरी तायक्वांदो असोसिएशन कडून मंत्री सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री सावंत म्हणाले, रत्नागिरी मध्ये तायक्वांदोला चांगले वातावरण मिळाले असून भविष्यात तायक्वांदो खेळासाठी आपण नेहमी पुढाकार घेऊ तसेच आगामी काळात लवकरच राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले जाईल. त्यासाठी संघटनेला सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. तीन दिवस आयोजित पंच परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय पंच नवीन चंद्रा ( बंगलोर) यांनी पंचांना मार्गदर्शन केले.यामध्ये पंचांना तायक्वांदो खेळातील नवीन नियमांची माहिती देण्यात आली. तसेच हँड सिग्नल, गुणपत्रक,प्रत्येक पंचांशी चर्चा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पंचांना फाईट लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले यानंतर पंचांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. पंचांची फिटनेस टेस्ट करण्यात आली. यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे , महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश कररा , शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे अजित घारगे, दुलिचंद मेश्राम, सतीश खेमसकर आदी उपस्थित होते.
28 मे रोजी औरंगाबाद ब्लॅक बेल्ट परीक्षा !!
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजीत औरंगाबाद ॲम्युचेअर तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये 28 मे रोजी ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य संघटनेच्या वतीने व औरंगाबाद जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे
Tags
क्रीडा