बीड जिल्ह्यातील निनगुर म्हणजेच आजचे नेकनूर.या गावी सन १८७७ साली श्री.गुरु बंकटस्वामी महाराज यांचा राजपूत समाजातील एका सामान्य कुटुंबात जन्म झाला.लहान असताना त्यांनी गाई सांभाळल्या.इगतपुरी येथे लक्ष्मण वाणी यांच्या दुकानावर काही दिवस काम केले.तेथेच लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांची भेट झाली व ते हरी भजनात रमू लागले.एकदा वै.सद्गुरु विष्णुबुवा जोग महाराज यांनी स्वामींचे भजन ऐकले.
स्वामींचा आवाज व चाली अतिशय गोड होत्या.जोग महाराज यांनी स्वामींना आळंदीला येण्याचा आग्रह केला. स्वामींनीही लगेच होकार दिला व त्यांच्या सोबत आळंदीचा मार्ग धरला.
भंडारा,भामचंद्र डोंगरावर ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा या ग्रंथांची पारायणे केली.त्याच वेळी वै.विष्णुबुवा जोग महाराज यांनी आळंदीत पहिली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. प.पु.मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती म.गुरव व बंकट स्वामी महाराज हे सर्व थोर महात्मे त्या संस्थेचे प्रमुख खांब होते. संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करून वारकरी संप्रदायाचे भरीव कार्य केले. स्वामींनी अनेक शिष्य घडविले त्यात संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा, श्रीकृष्ण महाराज लोहिया,माणिक बाबा ,नारायण बाबा घोडके, बन्सी महाराज नेवासेकर,बाबूलाल महाराज पाडळीकर,रामकृष्णभाऊ येडशीकर,माधव महाराज सुकाळे(गुरुजी)यांच्यासह अनेक कीर्तनकार व गुणवान घडविले. या थोर महात्म्याला पुण्यतिथीनिमित्ताने वंदन करू.
रामकृष्णहरि 🙏