15 पीडित मुलींची सुटका, 11 आरोपी अटक
Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
शिर्डी -
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या शिर्डी येथील सहा हॉटेलवर पोलीस पथकाने छापे मारून 15 पीडित मुलींची सुटका केली आहे. ते संपूर्ण देशातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांच्या शिर्डी मध्ये अशी घटना उघडकीस आल्यामुळे श्रद्धाळू भक्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे
शिर्डी शहर परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याची माहिती 5 मे रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्याप्रमाणे शिर्डी परिसरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 15 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
एकाच वेळी सहा हाय प्रोफाईल हॉटेल वर नियोजनबद्ध छापे टाकून पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे कौतुक केले.
सदरची कारवाई बी.जी. शेखर पाटील IG, मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.