तायक्वांदो, खो खो खेळाडूंना मिळाले अतिरिक्त गुण
सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी वर्गासाठी खुली तुकडी व आदिवासी तुकडी असे एकूण ८४ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थीनी यशाची परंपरा कायम ठेऊन घवघवित यश संपादन केले आहे. ७३ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीमध्ये स्थान मिळाले असून ९ विद्यार्थी प्रथम श्रेणी व २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. खुल्या तुकडीतील विद्यार्थी सागर संतोष केळगंद्रे ( ९४.८० %), ओंकार विक्रम पवार ( ९३.२० % ), विवेक विजय वनवे ( ९२.८० % ) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत. शाळेचा राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो खेळाडू सागर संतोष केळगंद्रे यास राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागासाठी विशेष क्रीडा गुण मिळाले आहेत.
आदिवासी तुकडीतील विद्यार्थी अभिषेक महादेव शिर्डे ( ९२.६० % ), लक्ष्मण टेमाजी डवरे ( ९०.८० % ), संतोष गणेश चौरे ( ९०.२० %) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर , डॉ. दीपाताई क्षीरसागर, युवानेते डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर तसेच संस्था प्रशासक श्री व्ही.आर. शिंदे सर, श्री देशमाने सर, श्री गुट्टे सर यांच्यासह सैनिकीचे प्राचार्य श्री डाके एस. ए. सर व सैनिकी विद्यालयाचे सर्व शिक्षक , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
शैक्षणिक
