तायक्वांदो ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन परीक्षेत अहमदनगरच्या 28 खेळाडूंचे यश, पाच जणांनी दिली राष्ट्रीय पंच परिक्षा


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
औरंगाबाद येथे पार पडलेल्या ऑफिशियल ब्लॅक बेल्ट प्रमोशन परीक्षेमध्ये अहमदनगर जिल्हा संघटनेच्या 28 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे यांनी दिली. 

      तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या क्रीडा व युवक सेवा मंत्रालय ,भारत सरकारच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय खेळ संघटने अंतर्गत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई आयोजित ऑफिशियल ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट तथा राष्ट्रीय पंच परिक्षा सेमिनार २०२३ रत्नागिरी व औरंगाबाद येथे अनुक्रमे पार पडले.

राष्ट्रीय पंच परीक्षा सेमिनार मध्ये अहमदनगरचे अलताफ कडकाले, गोरक्षनाथ गालम, लक्ष्मण शिंदे यांनी यश संपादन केले. महेश मुरादे यांनी 3 दान ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच परिक्षा, व त्याचबरोबर निकिता सुभाष लकारे हिने 2 दान ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच परिक्षेत यश मिळाले. 

संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉल येथे 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट मध्ये अहमदनगरच्या 25 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशन अंतर्गत संगमनेर येथील प्रशिक्षक लक्ष्मण शिंदे यांनी 3 दान ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले. त्याचबरोबर त्यांचे विद्यार्थी रुद्र नरेंद्र उडता, स्नेहा बाबासाहेब गुंजाळ व पूजा ज्ञानदेव पवार यांनी 1 दान ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले. 
राहुरीचे प्रशिक्षक बाबासाहेब क्षिरसागर यांच्याकडे नियमित सराव करणारे, मयुरी आबासाहेब भांड, 
सिद्धार्थ आबासाहेब भांड, उदय संदिप भालेकर
शारदा संदिप भालेकर, साक्षी पंढरीनाथ तांबे
हर्षदा मनोज शेटे, विनय संजय अडागळे, निशांत अमरदीप लोखंडे, निखिल शरद परजणे, श्वेता काळे, आदित्य कराळे या खेळाडूंनी 1 दान ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले. 

राहता तालुक्यात कार्यरत असलेले महेश मुरादे यांचा विद्यार्थी गौरव लकारे याने 2 दान तर
वीरा राहुल विखे,शामल प्रवीण तुपे,श्रावणी प्रवीण विखे,काव्या अभिजीत खर्डे,दर्शन प्रवीण तुपे
आरव अभिजीत खर्डे,आनंद बाबासाहेब सांगळे या खेळाडूंनी 1 दान परीक्षेत यश संपादन केले. बाबळेश्वर येथे कार्यरत असलेले प्रशिक्षक दिनेशसिंह राजपूत यांचा विद्यार्थी विवेक रवींद्र तुपे याने 1 दान ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले.

 तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे , महासचिव मिलिंद पठारे,  शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे , कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, अजित घारगे, निरज बोरसे, सतीश खेमसकर यांची यावेळी उपस्थित लाभली . 

सर्व यशस्वी खेळाडूंचे अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. 


Post a Comment

Previous Post Next Post