महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
राहुरी येथील तायक्वांदो प्रशिक्षक बाबासाहेब क्षिरसागर यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी जोगेश्वरी आखाडा परिसरातील घनकचरा विघटन विभागाला भेट दिली. व त्याविषयीची संपूर्ण माहिती आत्मसात केली. व त्याचबरोबर वृक्ष लागवड केली.
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनची मान्यताप्राप्त असलेल्या राहुरी तालुका तायक्वांदो अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी राहुरी नगरपरिषदेच्या घन कचरा विभाग जोगेश्वरी आखाडा परिसर या ठिकाणाला भेट दिली व त्या ठिकाणच्या प्रत्येक सेक्शनची तेथील तज्ञाकडून माहिती जाणून घेऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्वं गोष्टी समजून घेतल्या.
त्या ठिकाणी दुर्मिळ व आयुर्वेदिक डीकामली ,करवंद,व ड्रॅगन फ्रुट या वृक्षच्या रोपांची लागवड केली. अकॅडमीच्या आधारस्तंभ डॉ. सौ. उषाताई तनपुरे या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणा विषयी व घन कचरा विघटना विषयी खूप मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली. व त्यांनी राहुरी तालुका तायक्वांदो अकॅडमी चे व सर्व विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले. कारण ही अकॅडमी तायक्वांदो खेळा बरोबरच विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. व अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मानसिक विकास घडून आणत असते.
यावेळी तायक्वांदो खेळाडूंसोबत पालकही उपस्थित होते. यावेळी यामध्ये लोखंडे मॅडम, गवते मॅडम,रोकडे मॅडम,रवी पवार सर,किशोर वडीतके सर, आबासाहेब भाडं सर चंद्रकांत घोरपडे सर, शेळके सर, मेजर सुनील खुळे सर उपस्थित होते.
राहुरी नगर परिषद घन कचरा विभागाचे अधीकारी पवार साहेब , शेळके साहेब, कुलकर्णी साहेब, विशाल खेडकर साहेब , विजय बीवाल साहेब यांनी विद्यार्थ्यांची नाष्टाची शोय करून सर्वं विद्यार्थ्यांना उत्तम असे मार्गदर्शन केले त्या बद्दल या सर्वचे अकॅडमीच्या वतींनी तायक्वांदो प्रशिक्षक बाबासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले.