जामखेड पासून सहा किलोमीटर अंतरावर कर्जत रोडवरील पाटोदा गरडाचे जवळ चार चाकी दोन वाहनांचा अपघात झाला. त्या वेळी रहेमान सुलतान शेख वय ७५ मु. पो. दुरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर हे जखमी झाले. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाली असता संजय कोठारी हे संतोष सूराणा, गोकुळ जाधव यांना घेऊन घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अपघातातील जखमीला डोक्याला मार लागल्याने खाजगी दवाखान्यात त्यांना ऍडमिट केले आहे.
हाकिकत आशी की कर्जत रोड चे काम अपूर्ण असल्यामुळे एक साईडला दोन्ही वाहन जाणारे येणारे जात आहेत त्यामुळे अपघात वाढत आहेत बऱ्याच जणांचे प्राण गेले आहेत तर कोणाचे हात गेले तर कोणाचे पाय गेले अशी खंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केली.
गेल्या आठ दिवसात पाच अपघात झाले यापैकी दोन दोघांचा मृत्यू झाला तर तीन जणांना वाचण्यात यश आले आहे असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले सर्व अपघात रोड खराब असल्याने होतात असेही ते म्हणाले
Tags
जामखेड