महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी अहमदनगरचा संघ जाहीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
रत्नागिरी येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. 

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने रत्नागिरी येथे 24 ते 26 जून दरम्यान 33 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत करिता अहमदनगर जिल्ह्याचा संघ नुकताच जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सैनिकी विद्यालय लोणी ता. राहता येथे रविवारी ज्युनिअर व कॅडेट जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंच म्हणून पुण्याचे 
सुरेश वाघमारे व विठ्ठल शेडगे यांनी काम पाहिले. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे
निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे
मुली 
श्रद्धा म्हस्के (बाभळेश्वर) 
ईश्वरी घुले (संगमनेर) 
दिया जोरवार (लोणी) 
साक्षी बडे (संगमनेर) 
गायत्री बारगजे (जामखेड) 
पायल आसलकर (पाथर्डी) 
साक्षी तांबे (राहुरी) 
श्वेता काळे (राहुरी) 
मानसी जाधव (लोणी) 

मुले 
निखिल शरद यादव (संगमनेर) 
नितीन दत्तात्रय म्हस्के (बाभबळेश्वर) 
कृष्णा ज्ञानदेव कोकणे (लोणी) 
सार्थक संजय साठे (बाभळेश्वर) 
यश इंद्रभान पाबळ (लोणी) 
साईनाथ रावसाहेब धनवटे (लोणी) 
हे सर्व खेळाडू शुक्रवारी रत्नागिरीला रवाना होणार आहेत खेळाडूंसोबत प्रशिक्षक म्हणून दिनेशसिंह राजपूत व व्यवस्थापक म्हणून लक्ष्मण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

वरील सर्व खेळाडूंना लोणी येथील प्रशिक्षक महेश मुरादे, प्रभाकर शेळके, दिनेश राजपूत अमोल बोधक, ब्रम्हचैतन्य राजगुरु राहुरीचे प्रशिक्षक बाबासाहेब क्षीरसागर, पाथर्डी येथील अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, सागर सानप, संगमनेरचे प्रशिक्षक लक्ष्मण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 या सर्व खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे सर कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, सचिव संतोष बारगजे, उपाध्यक्ष किरण बांगर सहसचिव अल्ताफ कडकाले, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

वंचित खेळाडूंनाही संधी देणार
संघटनेच्या सोबत प्रवाहात नसलेले अथवा काही कारणास्तव संघटने बाहेर असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षकांकडे सराव करणार्‍या खेळाडूंना अधिकृत स्पर्धेपासून वंचित रहावे लागत आहे. अशा खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून अशा प्रशिक्षकांची जिल्हा संघटनेकडे रितसर नोंदणी करून घेऊन त्याच प्रशिक्षकांच्या अंतर्गत असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील सर्व खेळाडूंना यापुढे जिल्हा संघटनेच्या माध्यमातून अधिकृत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. 

संतोष बारगजे 
सचिव अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशन

Post a Comment

Previous Post Next Post