जामखेड येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी यांच्या पत्नी आणि उद्योजक आनंद कोठारी यांच्या मातोश्री यांचे ३/६/२०१४ साली निधन झाले होते
प्रत्येक स्मृति दिवसानिमित्त काही नाही काही समाज उपयोगी उपक्रम घेऊन त्यांच्या स्मृतीस उजाळा देऊन श्रद्धांजली देण्यात येते यावर्षी गौशाळेतील गायांना चारा देण्यात आला तसेच नळी वडगाव येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना अहमदनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठांन भोजन देण्यात आले.
यावेळी बोलताना भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल तातेड म्हणाले स्वर्गवासी आमच्या काकीसा सौ शोभाबाई कोठारी या खूप मनमिळाऊ होत्या अतिशय धार्मिक व दानशूर अशा होत्या त्यांच्या जाण्याने कोठारी परिवारावर नाही तर आमच्या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता आज त्यांना जाऊन नऊ वर्ष झाले आहेत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जैन श्रावक संघाचे कांतीलाल कोठारी यांनी आज नळी वडगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमातील वृद्धांना आणि अहमदनगर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना मिष्टांन्नभोजन दिले तसेच गोशाळेतील गायांना चारा दिला त्यांच्या आठवणी पूर्ण जागृत राहण्यासाठी दरवर्षी असे उपक्रम करावेत
या वेळी कांतीलाल कोठारी संजय कोठारी भारतीय जैन संघटना जिल्हा सचिव प्रफुल सोळंकी, रोहिदास केकाण आदी उपस्थित होते