जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित देहदान संकल्प अभियान
जामखेड प्रतिनिधी
बुधवार दिनांक६/६/२०२३ रोजी सावळेराम भानुदास बळे वय ५५,मुक्काम मु.पो.जोगेश्वरी पारगांव तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी आज कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःचा मरणोत्तर देहदान संकल्प अभियान अंतर्गत फॉर्म भरलेला आहे.
यावेळी बोलताना सावळेराम बळे म्हणाले मी गेले बऱ्याच दिवसापासून देहदान संकल्प अभियानात फार्म भरायचा असे डोक्यात होते आमचे मित्र टाकळसिंग येथील डॉक्टर सुनील देविदास पठाडे यांनी मला जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे देहदान फॉर्म भरले जातात अशी माहिती दिली आणि कोठारी यांचे सामाजिक कार्य खूप उल्लेखनीय आहे अपघातातील लोकांना वाचवायचे काम त्यांनी बऱ्याच वर्षापासून चालू ठेवले आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मोठे काम केले आहे.
यावेळी बोलताना सावळेराम भाणुदास बळे म्हणाले देहदान केल्या नंतर माझ्या देहापासून अनेक डॉक्टर बनतील आणि अनेकांचे प्राण वाचवतील माणूस मेल्यानंतर त्याची राख होण्या पेक्षा आपला देह कोणाचे तरी कामाला यावा या उद्देशाने मी आज जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या ऑफिसला येऊन स्वखुशीने फॉर्म भरत आहे.
मी डॉक्टर सुनील देविदास पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे येऊन देहदान चा फॉर्म भरलेला आहे
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले सावळेराम भानदास बळे हे आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथील असून हे बऱ्याच दिवसापासून सामाजिक कार्य करतात यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे कोरोना काळामध्ये गोरगरिबांची मदत त्यांनी केली आहे त्यामुळे आनंद वाटला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आत्तापर्यंत ४७५ जणांनी देहदान चे फॉर्म भरले असून ११ जणांनी डोळे दान, अवयव दान, देह दान केलेले आहेत या कामात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगर यांचे आणि डॉ. सुधीर पवार यांचे सहकार्य लाभले
यावेळी डॉ. सुनील देविदास पठाडे, बापूराव बाबुराव मोकासे आदी उपस्थित होते.