मिशन आपुलकी अंतर्गत जामखेड तालुक्यात 21 लाखाचा निधी :- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे...


जामखेड :- मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधून रोख व वस्तू स्वरूपाने जवळ जवळ 21 लाख रुपयांचा निधी समान सहभागातून उपलब्ध झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली.
     जामखेड तालुक्यातील 11 केंद्रामधून निधी प्राप्त झाला आहे साकत - 410950 रुपये, खर्डा - 352500 रुपये , नायगाव - 39700 रुपये , अरणगाव - 203650 रुपये , राजुरी - 200882 रुपये, पाटोदा - 53200 रुपये, जामखेड-  216200 रुपये, नान्नज - 77350 रुपये, तेलंगशी - 265650 रुपये, सोनेगाव - 56500 रुपये, हाळगाव - 220961 रुपये. असा निधी प्राप्त झाला आहे.
 जामखेड तालुक्यातील विविध गावा मधील ग्रामस्थ, पालक, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांनी चांगली मदत केली. त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख, देणगीदार या सर्वांचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post