जामखेड शहरातील वाहतूक नियंत्रण व नियमन करण्यासाठी नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने १० बॅरिकेट भेट, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मानले आभार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : २० आॅगस्ट 
   अहमदनगर जिल्ह्यात अर्थिक व सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेल्या श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. अहमदनगर वतीने जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेसाठी दि. १५ आॅगस्ट स्वातंत्र दिन व श्रीनागेश्वर यात्रेचे औचित्य साधून १० बॅरिकेटस दिले असून या कामासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे व जामखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहेत. 

   जामखेड शहर हे अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या चार जिल्ह्याच्या हद्दीरील व मोठी व्यापारी बाजार असलेले शहर असल्याने याठिकाणी वाहनाची मोठी रहदारी असते. असे असतानाही गेली अनेक वर्षे जामखेड शहरात वाहतूक शाखेचे काम अतिउत्तम राहिलेले आहे. ते तसेच राहावे नव्हेतर आणखी उत्तम व्हावे यासाठी तसेच जामखेड पोलीस स्टेशनकडे ट्राफिक बॅरिकेटची असलेली अडचण लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यातील अर्थिक दृष्ट्या व सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेल्या श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. चे चेअरमन कडूभाऊ काळे यांनी आपल्या जामखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक वैभव ताबे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक अमोल जताडे, रोखपाल अशोक कापसे व लिपीक राहुल वाझडकर यांच्या मार्फत व हस्ते जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेसाठी १० बॅरिकेटस भेट दिले आहेत. 
     यामुळे अगोदरच उत्तमरीत्या सुरू असलेले वाहतूक शाखेचे वाहतूक नियमनाचे काम आणखी उत्कृष्टपणे चालणार आहे. या चांगल्या सामाजिक कार्यासाठी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. चे चेअरमन कडूभाऊ काळे व जामखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांचे जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील, वाहतूक शाखेचे इनचार्ज सहाय्यक फौजदार लहु यादव, पोलीस काॅन्स्टेबल दिनेश गंगे, होमगार्ड रफिक तांबोळी व हरिष पवार यांनी आभार व्यक्त केले आहेत. 

जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पदभार घेतल्यापासून जामखेड शहरात अनेक चांगल्या कामांसाठी शहरवासीयांचे सहकार्य मिळत असून पो. नि. पाटील यांनी एक CCTV कॅमेऱ्या पोलिसांसाठी या उपक्रमाच्या चांगल्या प्रतिसादानंतर श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी कडून मिळालेले १० बॅरिकेट म्हणजे नागरिकांचा जामखेड पोलीसांवर वाढत चाललेला विश्वास आहे.

Post a Comment

Previous Post Next Post