अहमदनगर जिल्ह्यातील तायक्वांदोचे सुर्णाक्षरी काळ!जिल्ह्यात 30 वर्षापासून ग्रामीण भागात तायक्वांदो खेळ रुजवण्याचे प्रयत्न

आज जागतिक तायक्वांदो दिन....
 या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील तायक्वांदो या खेळाचा घेतलेला आढावा..... 

दक्षिण कोरियातला तायक्वांदो हा विदेशी खेळ अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे पहिल्यांदा प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. ती तारीख होती, 17 जून 1994. या दिवशी जामखेडच्या ल. ना. होशील विद्यालयाच्या प्रांगणात तायक्वांदो खेळाची तंत्रशुद्ध प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. यानंतर, हा खेळ आता जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. त्याचे क्षेय जाते ते म्हणजे संतोष बारगजे आणि डॉ. अविनाश बारगजे या बंधूंकडे. 
साधारण 1992, 93च्या दरम्यान पाथर्डीमध्ये डॉ. अविनाश बारगजे व शंकर जेथे यांनी तायक्वांदोचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्यावेळी डॉ. अविनाश बारगजे यांचे धाकटे बंधू संतोष बारगजे सहप्रशिक्षक म्हणून त्यांच्याबरोबर काम करायचे. पुढे डॉ. अविनाश बारगजे उच्च शिक्षणासाठी विदेश दौरा केला. यानंतर पाथर्डीच्या क्लासची धुरा शंकर जेधे यांनी सांभाळी, तर संतोष बारगजे यांनी जामखेडला 1994 साली पहिले तायक्वांदोचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.
त्यावेळी या खेळाला फारशी ओळख नव्हती; तायक्वांदो खेळाचे नाव सांगितल्यावर सहसा कोणला कळतही नसायचे. म्हणून, त्यापुढे कंसात कोरियन कराटे असे लिहावे लागायचे. त्या काळात बारगजे बंधूंनी या विदेशी खेळाचा खूप प्रसार-प्रचार केला. जिल्ह्यासह जवळच्या म्हंणजेच, मराठवाड्यातील आष्टी, पाटोदा, कडा यासारख्या ठिकाणी प्रत्यशिके दाखवून या तायक्वांदो खेळाकडे मुलांना आकर्षित करण्याचे काम केले. 

डॉ. अविनाश बारगजे यांनी दक्षिण कोरीया येथे तायक्वांदोचे अत्याधुनिक तंत्रशुद्ध पदविकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी तेथून परतल्यानंतर काही काळ जामखेडला तायक्वांदोचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचे एक छोटेसे रोपटे लावले. पुढे त्यांनी बीडला आपले मुख्यालय बनवले. तेथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. बारगजे बंधूंनी आपापल्या जिल्हा संघटना स्थापन केल्या. अहमदनगर जिल्ह्यासाठी 1998मध्ये जीन-सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर या नावाने संस्था स्थापन करण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकले, तसेच इतर पदांवर डॉ. अविनाश बारगजे, रवींद्र शिर्के, सादिक शेख, देवेंद्र बारगजे व सौ. सुरेखा मुंढे यांनी काम पाहतात. 
डॉ. अविनाश बारगजे यांनी लावलेल्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचे छोटेसे रोपट मुख्य प्रशिक्षक संतोष बारगजे यांनी योग्य रीत्या संभाळले. पुढे 1999ला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संस्थेने जीन-सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर या जिल्हा संघटनेला मान्यता दिली. येथूनच खर्‍या अर्थाने अहमदनगर जिल्ह्यात तायक्वांदो खेळ वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला जामखेड येथून सागर म्हेत्रे, दुर्गाप्रसाद मेडबोईना, युवराज पोटरे या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली. सागर म्हेत्रे याने जिल्ह्याला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून दिले. त्यावेळी संपूर्ण जामखेड शहरातून त्याची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती. यानंतर जिल्ह्याच्या ताक्वांदोने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंर सचिव वराट, सुर्यकांत कदम, अलताफ कडकाले, सादिक शेख, मुयेरेश सोपल, पूनम घोलप, बाळासाहेब गर्जे, योगेश पवार, कांतीलाल जगदाळे, अनुराधा उतेकर, कोमल शिंदे, गायत्री बारगजे या खेळाडूंनी राज्यस्तरावर नावलौकिक मिळवला. त्यातील बरेच खेळाडू सध्या विविध खात्यात नोकरी करत आहेत.
जिल्हा संघटनेने अंतर्गत जामखेड येथे संतोष बारगजे, पाथर्डी येथे शंकर जेधे, अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम व सागर सानप, अहमदनगर शहरात अलताफ कडकाले, शकील सय्यद, सुरेश वाघ, महादेव मगर, रवी यादव, गणेश धिवर, 
श्रीगोंदा येथे सचिन आगळे, राहुरी येथे बाबासाहेब क्षीरसागर, राहता येथे दिनेशसिंग राजपूत, प्रभाकर शेळके, ब्रह्मचैतन्य राजगुरू, महेश मुरादे, संगमनेर येथे लक्ष्मण शिंदे, पारनेर येथे संतोष परांडे आदी प्रशिक्षक काम पाहत आहेत.
पाथर्डी येथे शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम व सागर सानप प्रशिक्षणाचे काम पाहत आहेत. तेथून शीतल कांबळे, संध्या ससाणे, गोविंद रुपनर, सचिन खेडकर, आर्या देवढे, आर्यन देवढे या खेळाडूंनी राज्यस्तरावर विविध पदके पटकाविली. तसेच, पायल आसलकर, प्रणिता देवढे, समृद्धी पाथरकर, गायत्री पवार, सौरभ दिनकर, सागर सानप या खेळाडूंनी शालेय स्तरावर चांगली कामगिरी केली.
राहता तालुक्यामध्ये सचिन आगळे यांनी काम पाहिले. त्यावेळी सोपान बडधे या खेळाडूने सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले. राहता तालुक्यात सध्या महेश मुरादे, दिनेशसिंह राजपूत, अमोल बोधक, प्रभाकर शेळके, ब्रह्मचैतन्य राजगुरू आदी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. 
दिनेशसिंह राजपूत यांच्याकडे स्वप्नाली शिंदे ही पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू घडली. तिने अनेक वेळा राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत पदके जिंकली, शासनाचा गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरस्काराची तायक्वांदो खेळातील पहिली मानकरी ठरली आहे. सोनाली खोबरे, प्रतीक्षा देवरे, पूजा सावंत, दीशा देशमाने यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली. महेश मुरादे यांच्याकडे सराव करणार्‍या सौरभ गाडेकर, धनंजय धावणे, जय अकोलकर व वीरा विखे या खेळाडूंनी संघटना व शालेय पातळीवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदके पटकाविली आहेत. 
अहमदनगर शहरात शकील सय्यद, रवी यादव, गणेश धिवर यांच्या वैष्णवी कदम, वैष्णवी बेरड, अनन्या रणसिंग या खेळाडूंनी राज्यस्तरावर सुवर्णपदक व राष्ट्रीयस्तरावर पदके पटकाविली आहेत. तर, श्रावणी रणसिंग, प्रियंका मिसाळ, सलोनी प्रसाद, आकांक्षा दराडे, अक्षय साळुंके, चतुर्थी गायकवाड या खेळाडूंनी राज्यस्तरावर विशेष कामगिरी केली आहे. अहमदनगर शहरात सुरेश वाघ यांच्याकडे सराव करणार्‍या हर्षदा घारे, सार्थक निमसे, कल्याणी गोपाळघरे, अथर्व दहिफळे, इरफान सय्यद या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर, तर शरयू राऊत, श्रीया पटवा, संयुक्ता पासकंटी, सूर्या गर्जे, ज्ञानेश्वरी रोडे, ओम गायकवाड या खेळाडूंनी राज्यस्तरावर पदके जिंकली आहेत. महादेव मगर यांच्याकडे सराव करणार्‍या दहा खेळाडूंनी आजवर राज्यस्तरावर ब्राँझपदके पटाकाविली आहेत. 
संगमनेर येथे लक्ष्मण शिंदे यांच्याकडे सराव करणार्‍या कुष्णा चव्हाण, शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक, ईश्वरी बाळासाहेब घुले ब्राँझ, तर मयुरी गुंजाळ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळविले आहे. 
विशेष उपक्रम 
जिल्हा संघटनेचे मुख्यालय जामखेड येथे मुख्य प्रशिक्षक संतोष बारगजे यांनी मागील अनेक वर्षांपासून मुलींनी निर्भीड व्हावे, स्वतःचे रक्षण करावे या उदात्त हेतूने दरवर्षी एक ते तीन महिने मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून हजारो हजारो मुलींना तायक्वांदोचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत.
------------------------------

1 Comments

  1. खूपच छान सर..... अहमदनगर जिल्हा संघटना कायमचे खेळाडूच्या हितासाठी लढत राहते....

    ReplyDelete
Previous Post Next Post