महाराष्ट्र न्युज नेटवर्क : ५ सप्टेंबर
आष्टी शहरातील अनिशा ग्लोबल स्कुल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुनिता राजेंद्र गायकवाड यांचे मंगळवारी शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने जामखेड शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सुनिता राजेंद्र गायकवाड
या नेहमीप्रमाणे आज आष्टी येथील अनिशा ग्लोबल या शाळेत ड्युटी साठी गेले असता शाळेत आयोजित शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना दुपारी १२:०० वाजताचे सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. व त्या खुर्चीवरून खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असुन अत्यंसंस्कार आज दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.
मयत सुनिता राजेंद्र गायकवाड यांच्या मृत्युमुळे जामखेड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या मागे पती राजेंद्र गायकवाड व दोन मुली असा परिवार आहे.