जामखेड :- जामखेड तालूक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसरवाडी ता. जामखेड येथील उपक्रमशिल , शिक्षक श्री . एकनाथ पंढरीनाथ चव्हाण यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा सन २०२२- २०२३ चा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .त्या बददल जामखेड तालुक्यातील शिक्षकांच्या व प्रशासनाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अभिनंदन केले आहे .
याआधीही बसरवाडी शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच ही शाळा जिह्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त झालेली शाळा आहे . एका चांगल्या शिक्षकाचा सन्मान झाल्याने त्यांनी केलेल्या कामाची प्रेरणा इतर शिक्षकांना नक्की मिळेल .
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ,शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल जाधव . त्र्यंबके , शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत , केंद्रप्रमुख राम निकम , नारायण राऊत 'केशव गायकवाड , बाळासाहेब कुमटकर , सुरेश मोहिते , संतोष वांढेकर ,रामदास गंभीरे , घोडके , पारखे , सुनील भामुद्रे , बाळासाहेब गांगर्डे ,नरवणे , श्रीम. ससाणे श्रीम. कात्रजकर , श्री. निमसे पाटील , यांनी अभिनंदन केले आहे .