सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे वाचलेले एकाचे प्राण



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड कर्जत रोडवरील जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर चार चाकी कार वर दुचाकीस्वार जाऊन धडकला. या अपघातात मोटरसायकल MH 12 CQ 1853 वरील बिभीषण गोरख जेवे वय 65 मुक्काम पोस्ट खडकत तालुका आष्टी जिल्हा बीड यांची टोपी खाली पडल्याने आपल्या सोबत असलेल्या पत्नीला टोपी घेण्यास सांगून गाडीवर असताना समोरील चार चाकी GJO 5RN 6907 या गाडीला जाऊन धडकल्याने स्वतः जखमी झाले घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपले मित्र सनी सदाफुले यांना घेऊन नेहमीप्रमाणे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पाच मिनिटात दाखल झाले. 

डोक्यात ला मार लागल्याने बिबीशन गोरख जेवे हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते त्यांना कोठारी यांनी ताबडतोब रुग्णवाहिक टाकून जामखेड येथे दवाखान्यात हलवले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले या कामी पप्पू पारवे, धनंजय काळाने यांनी मदत केली. 

 जामखेड तालुक्यातील चारी बाजूने रोडचे काम चालू असल्याने रोजचा अपघात होऊन लोक घसरून पडत आहेत त्यामुळे हे अपघात होतात काल सुद्धा एक अपघात झाला होता रोजच अपघात होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
- सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी

Post a Comment

Previous Post Next Post