महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
आमदार राम शिंदे यांच्या पत्नी व पंचायत समितीच्या माजी सभापती सौ आशाताई राम शिंदे यांच्या हस्ते जामखेड शहरातील बुरुड गल्ली दुर्गा माता मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त महाआरती करण्यात आली. यावेळी श्री दुर्गा माता मंदीर ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी मंदिराच्या विकास कामासाठी आमदार राम शिंदे यांना मागणीचे पत्र देण्यात आले.
श्री दुर्गा माता मंदीर ट्रस्ट च्या वतीने दरवर्षीप्रमाणे बाजार तळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सकाळी व सायंकाळी येथे महापूजा व आरती करण्यात येते त्या अनुषंगाने आमदार राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई राम शिंदे यांच्या हस्ते महापूजा व महाआरती करण्यात आली यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सौ आशाताई शिंदे यांच्याकडे आ.राम शिंदे यांना ट्रस्टच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात जामखेड येथील बाजारतळ या ठिकाणी असलेल्या दुर्गा देवी मंदिरासाठी सभामंडप मंजूर करण्याबाबत मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की "भाजी बाजारतळ याठिकाणी श्री दुर्गा देवी जागृत देवस्थान असून सदर मंदिर कामी सभामंडप होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणे करून सदर मंदिराची तसेच परिसराची शोभा वाढण्यास मदत होईल. अशी भाविक भक्तांची आपेक्षा आहे. तरी आपल्या स्थानिक
विकास निधी अंतर्गत सदरील मंदिरासाठी सभा मंडपासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी शारदा पवार, लक्ष्मी पवार, कल्पना जसाभाटी, राधाबाई मोरे,सपना पवार,सोनम मोरे,रेखा मोरे,प्रिती मोरे, अश्विनी मोरे, श्रध्दा पवार शकुंतला जमदाडे यांच्या हस्ते माजी सभापती अशाताई शिंदे यांना निवेदन दिले.
यावेळी श्री दुर्गा माता मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता पवार, सचिव प्रा. कैलास माने सर, राहुल मोरे,रवि वडे,राजु पवार,सनी मोरे, आशुतोष बिडकर, बालाजी मोरे, देविदास भादलकर, महेश कटारिया, पिंटू शेठ बोथरा, विनोद शेठ नवले,मनिष जैन, संतोष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री नागेश्वर भजनी मंडळाचे भजन