महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते एवन टेक्सटाईलचा शुभारंभ होणार आहे.
खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार सुरेश धस, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले, प. पू. पांडुरंग शास्त्री देशमुख, हभप रामकृष्ण महाराज रंधवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होत आहे.
जामखेड शहराच्या वैभवात भर घालणारे भव्य दिव्य एवन टेक्सटाईल मध्ये क्लॉलीटी, व्हरायटी, डिझाईन, फिटिंग सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होत आहे.भव्य अशा एवन टेक्सटाईलचा शुभारंभ विजयादशमीच्या दिवशी अध्यात्मिक, राजकीय व सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या हस्ते होत आहे. तसेच जामखेड तालुक्याच्या जडणघडणीत कै. विठ्ठलराव (आण्णा) राऊत यांचे मोठे योगदान आहे , आण्णानी नेहमी शैक्षणिक , सामाजिक ,आर्थिक राजकीय व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर भुमिका बजावली. त्यांचे व बोराटे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते आणि यातुनच जामखेडची बाजारपेठ वाढली पाहिजे याच संकल्पनेतून कै.विठ्ठलराव (आण्णा) राऊत व साधु (नाना) बोराटे यांनी एवन टेक्सटाईलची मूहर्तमेड रोवली. परंतु कोरोना काळात विठ्ठल आण्णा राऊत यांचे निधन झाले तद्नंतर राऊत कुटुंबीयांच्या बरोबर खंबीरपणे उभे रहात साधु नाना बोराटे यांनी या कापड दालनाचे काम पुढे नेले व त्यामुळे आता विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर एवन टेक्सटाईलचा भव्य असा शुभारंभ होत असल्याने वै.आण्णांचे स्वप्न साकार होत आहे.
चार मजली सुसज्ज असे हे दालन हे संपूर्णपणे वातानुकूलित आसलेले हे वस्रदालन आहे. या दालनात नाविन्यपूर्ण व्हरायटी, दर्जेदार वस्रसेवा हे या दालनाची वैशिष्ट्य आहेत. जामखेड व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या भव्य दालनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वस्त्ररूपी सोने लुटा आणि आपल्या परिवारास नाविन्यपूर्ण वस्त्रांची भेट द्या असे अव्हान दोन्ही परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विनायक राऊत व राऊत परिवार तसेच बोराटे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.