भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी.. पंकजाताईंच्या स्वागतासाठी सावरगावकर सज्ज

 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर साध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख अतिथित दरवर्षी हा पारंपरिक दसरा मेळावा आलोट जनसागराच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न होतो. यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी दिली आहे.


दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 24 तारखेला हा भव्य मेळावा होणार आहे. या अनुषंगाने आपला दसरा आपली परंपरा जपण्यासाठी  संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ कामला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात  ठीक ठिकानी बैठक सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळव्याची  पारंपरिक सुरूवात केली होती. ती परंपरा पुढे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू ठेवली आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला 'भगवान भक्तीगड' असे नांव दिलेले आहे. भगवान भक्तीगडावरील आठ एकर परिसर व मंदिराची स्वच्छता तसेच अन्य कामानी वेग घेतला आहे. 


पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताची ग्रामस्थानी तयारी सुरु केली आहे.  मेळव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरुनही लाखोंच्या सांख्याने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. हा मेळावा म्हणजे  भक्ती आणि शक्तिचा संगम मनाला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्म आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात.  संत भगवान बाबा आणि लोकनेते मुंडे साहेबांना माननारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजाताई मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो यावर्षी देखील पंकजाताई मुंडे यांचे सावरगांवला आगमन होनार आहे संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन त्या मेळाव्यासाठी येतील त्या अनुषंगने आपला दसरा आपली परंपरा जपण्यासाठी  संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामला लागले आहेत


Post a Comment

Previous Post Next Post