तुळजाभवानीच्या पलंगाचे जामखेड मध्ये भव्य स्वागत

तुळजाभवानीच्या पलंगाचे जामखेड मध्ये भव्य स्वागत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
 तुळजाभवानी देवीचा मानाचा पलंग जामखेड शहरातून तुळजापूरकडे जात असताना शहरांमध्ये आज मोठ्या उत्साहात या पलंगाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविकांनी या पलंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.

नगर शहरातील केडगाव येथून दरवर्षी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा मानाचा पलंग जात असतो. नगर शहरातून जामखेड शहरांमध्ये हा पलंग आल्यानंतर जामखेड येथील विजय बोगावत व बोगावत परिवाराकडे पलंगाच्या विसाव्याचा मान आहे. या परिवारातील सर्व सदस्य देवीच्या पलंगाची व भक्तांची मोठ्या मनोभावे सेवा करत आहेत. शनिवारी दुपारी बोगावत यांच्या घरी हा पलंग आल्यानंतर कुटुंबीयांच्या वतीने देवीची पूजा व महाआरती करण्यात आली यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती येथे भक्तांनी दर्शन घेतले. 

आलेल्या सर्व भाविकांना पलंगाचे दर्शन घेता यावे, रस्त्यावर वहातुक सुरळीत रहावी यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काटेकोरपणे नियोजन केले होते. 

यावेळी पलंगाचे मानकरी आनंद पलंगे, बाबासाहेब पाचरणे,विजय बोगावत परिवारातील सदस्य, नगरसेवक अमित चिंतामणी, तात्याराम पोकळे, संजय काशिद, आण्णा विटकर,शरद जगताप, ऋतुराज फुटाणे, प्रकाश काळे,पंकज शेळके, गणेश हागवणे, गणेश वेदपाठक,राजु गवळी यांच्यासह मोठय़ा संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post