माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांचा सविस्तर राजकीय प्रवास नक्की वाचा


माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
माजी केंद्रीमंत्री मंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे आज निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 86 वर्षे होते. मागील आठवड्यात त्यांना श्वसनाच्या त्रास झाल्याने अहमदनगर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे यांचे ते वडिल आहेत.

    
ते बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.बबनराव ढाकणे हे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर सिंह यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.बबनराव व सुमनताई या दाम्पत्यास तीन अपत्ये. कै. राजकुमार, कै. शोभाताई व. श्री. प्रताप ढाकणे हे होत.

राजकीय वाटचाल :
बबनराव ढाकणे यांचा १० नोव्हेंबर, १९३७ रोजी पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात त्यांचा जन्म झाला.
८ एप्रिल १९५९ : शिक्षणाचा प्रसार खेडोपाडी होउन त्याचा लाभ सर्वांना मिळावा या उददेशाने महाराष्ट्र सरकारने 'मोफत सक्रिय शिक्षण' योजनेनुसार प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या 'व्हिलेज बेंच कमिटी' अकोले यावर अध्यक्ष म्हणुन निवड, त्याव्दारे शिक्षण जागृती, शालाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात आणणे आदि स्वरुपाची कामे.

१९६०: वडिलांनी स्थापन केलेल्या अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

०४ जुन १९६२: प्रथमच स्थापन झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी अपक्ष म्हणुन निवडणुक लढविली. 

१९६२ पाथर्डी तालुका सहकाही सुपरवायमिंग युनियनचे प्रेसिडेंट निवडणूकीमध्ये विजय (आजचा तालुका देखरेख संघ), पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमिटी) संचालक पदाचे निवडकीत विजय.

 ०१ जुन १९६७: अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळी मानुर गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने एकमेव उमेदवार म्हणून विजयी, जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदा निवड, 

०२ जुन १९७२ : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गठातुन स्थानिक जनता आघाडीचे उमेदवार म्हणुन विजयी. दुस-यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवड. 

६ ऑगस्ट १९७२ : पाथर्डी तालुका पंचायत समिती सभापती म्हणून निवड.

१० जानेवारी १९७७ : अहमदनगर जिल्हा जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड.  
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १९७८ मध्ये झाल्या. या निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन ३७१३४ मते प्राप्त होउन विजयी झाले. आमदार म्हणून पहिल्यांदा निवड.

०२ ऑगस्ट १९७८ : पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणुन निवड,

२१ डिसेंबर १९७९ पुलोद मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणुन निवड, 

७ मार्च १९७९ : महाराष्ट्र जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवडणुकीव्दारे बहुमताने निवड,

१९ फेब्रुवारी १९८० रोजी महाराष्ट्रातील पुलोद सरकार बरखास्त झाले.जून १९८० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या.पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन जनता पक्षाचा उमेदवार म्हणुन विजयी दुस-यांदा आमदार, आमदार निवास सुधारणा व व्यवस्थापन समिती अध्यक्ष 

८ जून १९८० पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी पक्ष विरहित तालुका विकास मंडळाची स्थापना,

०१ जुलै १९८० :महाराष्ट्र विधिमंडळ जनता पक्षाचे गटनेते म्हणुन निवड,

१७ डिसेंबर १९८१ महाराष्ट्र विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड,

०६ मार्च १९८५ : महाराष्ट्र विधानसभेवर पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन सलग तिस-यांदा विजयी.

२७ नोव्हेंबर १९८७ महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमधून पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती (सिनेटवर) निवडणूकीमधून निवड.

३० जुलै १९८८ महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणुन निवड. 

१९८९ लोकसभेच्या झालेल्या नवव्या सार्वत्रीक निवडणूकीत बीड जिल्हा लोकसभा मतदार संघातुन जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणुन निवड.

भारतातील पहिले वंजारी समाजाचे खासदार होण्याचा मान.

डिसेंबर १९८९ : लोकसभा सदस्य अनुपस्थिती समिती या वैधानिक समितीचे अध्यक्ष म्हणून निवड,

२१ नोव्हेंबर १९९० उर्जाराज्यमंत्री पदाचा कार्यभार. भारतातील पहिले वंजारी समाजाचे केंद्रीय मंत्री होण्या मान,  

१२ फेब्रुवारी १९९४ तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांचे उपस्थितीत पाथर्डी येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

 ०८ जुलै १९९४ महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड,

१६ सप्टेंबर १९९४ शरद पवार मंत्रीमंडळात महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री म्हणुन निवड, पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा कार्यभार,

 १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन आप्पासाहेब राजळे (काँग्रेस) यांच्या विजयात सिंहाचा वाटा.

 १९९९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रीत झाल्या. कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन पाथर्डी विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणूकीत पराभूत.

०८ एप्रिल २००१ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेकडेस सपुर्द केला. 

३१ ऑक्टोबर २००१ शेतक-यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी 'शेतकरी विचार दल' या राजकीय पक्षाची क्रांतीवीर नागनाथ आण्णा नाईकवाडी यांचे उपस्थितीत स्थापना.

२००२ : महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी विचार दल पक्षास अहमदनगर जिल्हयात जिल्हा परिषदेच्या सात तर विविध पंचायत समिती गणात दहा ठिकाणी विजय मिळाला.

२००४ पक्षीय राजकारणापासून आजतागायत अलिप्त होते.

८ जुलै १९६८ : पाथर्डी तालुक्याच्या रस्ते, वीज, जलसचन प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यविधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावली व सभागृहात उडी घेण्याचा प्रयत्न. सरकारच्या निषेधाच्या घोषणा.

०९ जुलै १९६८ : विधानसभा सभागृहात पत्रके भिरकावली प्रकरणी विशेष हक्कभंग समितीने ७ दिवसाच्या कैदेची शिक्षेची शिफारस केली.

यावर विधानसभा सभागृहात तब्बल तीन तास वादळी चर्चा झाली. अखेर सात दिवसाच्या कैदेच्या शिक्षेवर विधानसभा सभागृहाचे शिक्का मोर्तब. ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी.

१५ जुलै १९६८ : मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातुन सुटका.

१६ जुलै १९६८ : पाथर्डी शहरात अभूतपूर्व सत्कार व मिरवणूक.

१९६९ ते १९८७ : मुळा धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष (वांबोरी चारी आंदोलन )

या थोर नेत्याला महाराष्ट्र न्यूज पोर्टल च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. 

Post a Comment

Previous Post Next Post