महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : दिवाळीनिमित्त जामखेड शहरात कारडीयाक ॲम्बुलन्स असणे खूप मोठी बाब आहे कारण अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जामखेड वरून नगरला जाताना रोड खराब असल्यामुळे अनेक पेशंट दगावले गेले आहे. आत्ताच एका लक्झरी बसचा अपघात झाला त्यामध्ये नगरला जाईपर्यंत काही जणांचा मृत्यू झाला. रोड खराब आहेत आणि ॲम्बुलन्सची गरज आहे. आता ही ॲम्बुलन्स आल्याने अनेकांचे प्राण वाचतील. "असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केले.
दिवाळी निमित्त संजय कोठारी यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची पूजा करून या सेवेची सुरुवात करण्यात आली. यावेळी सद्दाम शेखला संजय कोठारी यांनी गाडीची माहिती विचारले असता या गाडीमध्ये व्हेंटिलेटर, पाच प्यारा मॉनिटर, डी फेब मशीन, सिरीज पंप, सक्शन मशीन, ऑक्सिजन सुविधा, आईस बॉक्स ,यु. व्हि.स्टरलायझर मशीन, सेंट्रल एअर कंडिशन तज्ञ डॉक्टर, अनुभवी स्टाफ हे या गाडीमध्ये असणार आहे. असे सद्दाम शेख यांनी सांगितले.
त्याचबरोबर एखाद्या गरीबाची परिस्थिती नसेल तर मी त्यास मदत करील असे आश्वासन गाडी मालक सद्दाम शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिले. यावेळी आशिष बोथरा, अमित पिपाडा आधी उपस्थित होते.
संपर्क - सद्दाम शेख 90284 71700