स्व. श्रीकवरबाई सुराणा यांचे मरणोत्तर नेत्रदान
जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे रहिवासी आणि सध्या कोल्हार (भगवती)येथे राहणारे शांतीलाल सुराणा स्वर्गवासी गोकुळदास आणि सुगंध सुराणा यांच्या मातोश्री आणि आनंद , सचिन यांच्या आजी श्रीमती
श्रीकवरबाई भगवानदास सुराणा वय ९२ यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे.
याकामी चंचल पॅथॉलॉजीचे डॉ. अशोक लोढा, राजेंद्र गुगळे ,हेमंत रांका ,निलेश शिंगवी, सुरेश कुंकूळोळ , योगेश मुथा यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी नेत्र विभाग तसेच त्यांच्या स्टाफने नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली.
श्रीकवरबाई सुराणा यांचा मुलगा शांतीलाल सुराणा यांनी सांगितले की "माझ्या आईची इच्छा होती की माझ्या नंतर माझ्या डोळ्याने एखाद्या गरजूला दृष्टी मिळावी. त्यामुळे आता ज्या व्यक्तीला हे डोळे बसवले जातील त्यांच्या डोळ्यांमध्ये माझी आई मी पाहणार आहे."
उदात्त हेतूने केलेल्या कार्याबद्दल सुराणा परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे