डॉ. सोपान गोपाळघरे यांची वंजारी महासंघाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

जामखेड प्रतिनिधी 
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील डॉ. सोपान गोपाळघरे यांची वंजारी महासंघाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली आहे. 

डॉ. सोपान गोपाळघरे यांना शालेय जीवनापासून समाज सेवा करण्याची आवड आहे. व तेंव्हापासून प्रतिनिधित्व करण्याची आवड आहे. 

विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ते महाविद्यालयीन जीवनात क्रीडा प्रतिनिधी अशी त्यांची सुरवात झाली. पुढे त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख, विद्यार्थी सेना सदस्य, या माध्यमातून आरोग्य शिबरे घेतली. सण १९९५ पासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले.पक्षाचा तालुका अध्यक्ष, डॉ.सेल तालुका उपाध्यक्ष, जामखेड तालुका व जिल्हा अध्यक्ष, डॉ.सेल. प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले.अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. शैक्षणिक मार्गदर्शन केले, कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली. विद्यार्थ्यांकरिता भगवानबाबा सार्वजानिक वाचनालय सुरु केले. राष्ट्रीय स्वंयसेवक म्हणून काम आहे. अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व सहभाग वार्षिक सप्ताह , नियोजन,पंढरपुराला जाणाऱ्या सर्व दिंड्या,पालख्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा गेली तीस वर्षांपासून देत आहेत.

खर्डा परिसरातील नागरिकांसाठी भाजपाच्या माध्यमातून अनेक मोफत आरोग्य तपासण्या व औषधोपचार शिबिरे घेतली, अनेक रक्तदान शिबिरे आयोजित केली .तसेच अहोरात्र गोरगरीब,दिनदुबळ्यांची वैद्यकीय सेवा करीत आहेत. १०८ रुग्णाहिकेच्या माध्यमातून जनसेवा करतात. ग्रापंचायत सदस्य असताना अनेक कामे मार्गी लावली , अनेकांना शासकीय योनांचा लाभ मिळविण्यासाठी मदत केली.या सर्व कार्याची दाखल घेत डॉ .सोपाना गोपाळघरे यांना वंजारी सेवा संघाच्या संस्थापक अध्यक्ष, प्रदेश संमवयक यांनी वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वैद्यकीय आघाडी पदी नियुक्ती केली असून त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post