तेलंगशी केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत जायभायवाडी शाळेचे यश

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :- जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा सोमवार दि.01 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा तेलंगशी येथे उत्साहात संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायभायवाडी येथील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात मानाचा बहुमान पटकावला. गटनिहाय व स्पर्धानिहाय ९ प्रथम क्रमांक, ५ द्वितीय क्रमांक आणि ३ तृतीय क्रमांक असे तिन्ही मिळून १७ बक्षिसे मिळवली.

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे पदवीधर शिक्षक श्री.गोविंद भोसले सर ,उपाध्यापक श्री.गणेश भालेराव सर, उपाध्यापक श्री.प्रकाश राठोड सर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर सपकाळ सर या शिक्षकांचे तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब धनवेसाहेब ,खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा तेलंगशी व खर्डा केंद्राचे केंद्रीयप्रमुख मा. श्री.केशव गायकवाडसाहेब , जायभायवाडी गावचे सरपंच मा.श्री. सुभाष जायभाय, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष श्री. संतोष जायभाय आणि शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले. 

विविध स्पर्धा यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे-

वक्तृत्व स्पर्धा , 
किलबिल गटात काजल जायभाय प्रथम क्रमांक, बालगटात श्रावणी जायभाय प्रथम क्रमांक, 
कुमार गटात सानिका जायभाय द्वितीय क्रमांक. 

हस्ताक्षर स्पर्धेत
 किलबिल गटात पृथ्वीराज भोसले द्वितीय क्रमांक, 
कुमार गटात स्वराज भालेराव द्वितीय क्रमांक, 
बालगटात अभिजीत जायभाय तृतीय क्रमांक. 

गोष्ट कथाकथन स्पर्धेत
बालगटात कोमल जायभाय प्रथम क्रमांक, 
कुमार गटात मयूर जायभाय प्रथम क्रमांक 

वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत- बालगटात आदित्य सुभाष जायभाय प्रथम क्रमांक, 
कुमारगटात पृथ्वीराज संतोष जायभाय प्रथम क्रमांक, 
 किशोरगटात शुभांगी अश्रुबा जायभाय तृतीय क्रमांक

वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत
बालगटात शुभांगी बाजीराव जायभाय द्वितीय क्रमांक, 
 कुमारगटात मयूर बाजीराव जायभाय द्वितीय क्रमांक.

समूहगीत गायन स्पर्धेत
लहान गटात जायभायवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तर मोठ्या गटात जायभायवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

तसेच सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत लहान गट जायभायवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक व मोठा गट जायभायवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रथम क्रमांक पटकावला.

Post a Comment

Previous Post Next Post