आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने गोशाळेस चारा

    जामखेड प्रतिनिधी : आमदार राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ हॉस्पिटल(डॉ. भरत दारकुंडे) , व कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्यामार्फत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संचलित साकेश्वर गौशाळेतील शंभर गायांना हिरवा चारा देण्यात आला. 

    यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले या गौशाळेचे काम कोण पाहते यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडूराजे भोसले हे या गोशाळेचे नियोजन पाहत आहेत अडचणी भरपूर आहे येथे लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही शिंदे साहेबांनी ताबडतोब होकार दिला आणि गौशाळेसारखे चांगले कार्य तुमच्या हातून घडते हे मला आनंद वाटला असे ते म्हणाले यावेळी त्यांनी आवर्जून सर्व विचारपूस केली खाटीक कडे जाणाऱ्या  गाया सांभाळणे सोपे नाही असे ते म्हणाले याप्रसंगी. 

    सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आम्ही बारा महिने प्रत्येकाचा वाढदिवस कसलाही कार्यक्रम असला की या गाण्यांना चाऱ्याची व्यवस्था करतो बारा महिने जामखेड तालुक्यातील सर्वजण मदत करतात म्हणून ही गोशाळा चालू आहे पांडू राजे हे जातीने लक्ष देतात तेथील कर्मचारी सांभाळणे सोपे नाही  सर्व अडचणीला तोंड देत  गोशाळा नावावर रूपाला आलेली आहे यावेळी
,सचिन गाडे, अजय काशीद ,लहू शिंदे, गौतमराव उतेकर, सोमनाथ राळेभात, अल्ताफ शेख, शरद कारले, बिबीशन धनवडे, सुनील मोरे, सनी सदाफुले, हर्षल पोफळे ,अक्षय राळेभात आदी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post