मुलींनी व्यक्तीमत्व विकास व शारीरिक सदृढतेवर भर द्यावा-डॉ. पल्लवी सूर्यवंशी
जामखेड (प्रतिनिधी )-दि.8 फेब्रुवारी 2024 रोजी जि.प. प्रा. शाळा सारोळा या ठिकाणी इंदिरा हॉस्पिटल जामखेडच्या संचालिका,शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व,सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी (MBBS,DGO) यांनी "बदलत्या जीवनशैली मुळे उद्भवलेले आजार आणि मुलींचे समुपदेशन" या विषयावर अतिशय मार्मिक,समर्पक व सुंदर शब्दात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सूर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना स्वच्छतेच्या सवयी, गुड टच बॅड टच, पालेभाज्या,मोड आलेले कडधान्य, गूळ शेंगदाणे आदि सकस आहार घ्यावा,विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे, पहाटे उठून किमान अर्धा तास चालणे किंवा मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. तसेच मुलींचे समुपदेशन करताना, मासिक पाळी व त्याचे योग्य व्यवस्थापन करणे,बदलत्या जीवनशैली नुसार उद्भवाणारे आजार मधुमेह, लठ्ठपणा,पोट-डोळे-दात यांचे विकार या आजारांविषयी माहिती दिली.मासिक पाळी हा एक आजार नसून ती एक सामान्य शारीरिक क्रिया आहे असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.उत्कृष्ठ व प्रभावी रित्या मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. सूर्यवंशी मॅडम यांचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जगताप सर,श्री.शेख सर,श्री.लिमकर सर, श्री.सोळंके सर, श्री.होळकर सर, सौ.शेख मॅडम, सौ.रसाळ मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या स्तुत्य अशा उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल, जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री.धनवे साहेब तसेच सारोळा गावच्या सरपंच सौ.रितूताई काशिद, भाजपा तालुका अध्यक्ष श्री.अजयदादा काशिद,उपसरपंच श्री.हर्षद मुळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किशोर सातपुते,उपाध्यक्ष राजेंद्र आजबे,पालक व ग्रामस्थ यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.