हळगाव शाळेत मुलींनी गिरवले तायक्वांदोचे धडे

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : हळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुली, सध्या “राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत” तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. 

    जामखेड तालुक्यातील हळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब. विस्तारअधिकारी- श्री. सुनिल जाधव साहेब. केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र त्र्यंबके साहेब मुख्याध्यापिका शकुंतला हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवनाथ हजारे, संभाजी तुपेरे , राजेंद्र मोहळकर , सुभाष फसले, दुर्गाराणी काळे, पोपट निगुडे ,रेवननाथ लोंढे. यांच्या सहयोगाने हे प्रशिक्षण सुरू आहे. 

    'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' प्रशिक्षण योजनेचे तालुकाप्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे तसेच अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण बांगर हे शाळेतील मुलींना तायक्वांदोचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढत आहेत. 

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post