राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत बावी शाळेतील मुलींना तायक्वांदो प्रशिक्षण



    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत बावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. या उपक्रमामुळे मुलींना व्यायामाची सवय लागली आहे.

    जामखेड तालुक्यातील हळगाव या केंद्रातील बावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब. विस्तारअधिकारी- श्री. सुनिल जाधव साहेब. केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र त्र्यंबके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री कैलास श्रीरंग दाखले, मुख्याध्यापक श्री अमोल पंढरीनाथ पवार
श्री सय्यद अय्युब चांद, श्री योगेश भगवान तुपविहीरे, श्री विशाल सुधाकर जंगाले
 या सर्व शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण देण्यात येत आहे.

    राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण बांगर हे तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. 

    जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर ओम बारगजे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत. या प्रशिक्षणामध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post