राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी महेश निमोणकर


राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी महेश निमोणकर 
जामखेड प्रतिनिधी : जामखेड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांची अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

 महेश निमोणकर हे उच्चशिक्षित असून, त्यांनी गेली पंधरा वर्षांपासून जामखेड शहरामध्ये महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, दुष्काळात मोफत पाणीपुरवठा व विविध आरोग्य शिबिरांसह अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ व नीलेश गायवळ या बंधूंचे समर्थक मानले जातात. नगरपरिषदेच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम केले. गरजू लोकांना ३५० घरकुले मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. एकुणच त्यांचा जामखेड शहरासह तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे. 

 त्यांच्या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला चांगले बळ मिळणार असून आगामी लोकसभा व निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासह याचा फायदा होईल असे दिसत आहे. त्यांच्या सह पिंपरखेड येथील बापूसाहेब शिंदे यांची तालुका उपाध्यक्षपदी व बाळासाहेब शिंदे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
या निवडीबद्दल त्यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post