कुसडगाव जि. प. प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जामखेड तालुक्यातील कुसडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. 

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसडगाव येथे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 तसेच जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ 2024 अंतर्गत इ 7 वी शिष्यवृत्ती इ 4 थी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये
 गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, (ट्रॉफी)प्रमाणपत्र, गुलाबपुष्प, व रोख  पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र ठरलेली
 इ.5 वी ची कु.सायली रामहरी जगताप हीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मिशन आरंभ मध्ये उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या इ.7वी तील कु.सानवी भरत काळे, 
कु.अक्षरा भरत पाठक, कु.प्रियंका गणेश कदम, 
कु.अक्षरा संजय जगताप

इ.4थी च्या कु.नंदिनी विशाल अब्दुले, चि.माऊली हनुमंत भोरे, कु.आरोही धनंजय राऊत, कु.पुनम परसराम कार्ले या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

 याप्रसंगी कुसडगावचे सरपंच श्री अंकुश कात्रजकर, सदस्य श्री नागेश कात्रजकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अंगद कात्रजकर, सदस्य भरत पाठक, भरत काळे, रामहरी जगताप सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नारायण कात्रजकर गुरुजी, मेजर शिवाजी कात्रजकर व माता पालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

मुख्याध्यापिका श्रीमती पवार कुसुम, श्री कचरे सर, श्री वाळेकर सर, श्री थोरात सर, श्री पाटील सर, श्रीमती फलके मॅडम सर्व शिक्षक वृंदाचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.


Post a Comment

Previous Post Next Post