विज्ञान गणित प्रदर्शन श्री नागेश विद्यालयात उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी 

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जामखेड मध्ये प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.

  साने गुरुजी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजन करून गणित विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली.

या प्रदर्शनामध्ये गणित विभाग 165 विज्ञान विभाग 57 गणित उपकरणाची नोंद झाली. 
        मान्यवरांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर उद्योजक विनायक राऊत, प्राचार्य मडके बी के पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , शिवाजीराव ढाळे, रघुनाथ मोहोळकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, गणित प्रदर्शन प्रमुख साळुंके बी एस, विज्ञान प्रदर्शन प्रमुख गोपाल बाबर, श्रीमती ढाकणे एस एम , ज्ञानेश्वर शेटे,शिंदे बी एस, संभाजी देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

   इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये  सहभाग घेतला, 
परीक्षक म्हणून गोपाल बाबर , देशमुख एस जे , विधाते मॅडम, ढाकणे एस एम यांनी परिक्षन केले. 
गणित विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी साळुंके बी एस,रघुनाथ मोहळकर, गोपाल बाबर, श्रीमती ढाकणे एस एम ,अशोक चौधरे,संतोष पवार,सांगळे ए एम , गाडे पी एस,स्वाती अभंग, ज्योती पालकर,  , शिनगारे एम एस, संभाजी इंगळे, ,साईप्रसाद लोखंडे रणदिवे एस आर, पठाण ए एन  ,आजबे व्ही ए,यांनी परिश्रम घेतले.
    या प्रदर्शनाला परिसरातील विविध शाळांनी भेट दिली.
    यावेळी शिवाजीराव ढाळे यांनी नागेश विद्यालय नेहमीच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असते अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेतात या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणारा आहे असे मनोगत व्यक्त केले. 
    विनायक राऊत यांनी प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आपल्या विद्यालयातून भविष्यात बालवैज्ञानिक घडावा अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व शिक्षकांनी प्रदर्शनाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने  केले त्यांचेही अभिनंदन केले.
          प्रदर्शनासाठी एनसीसी कॅडेटचे सहकार्य लाभले
      सूत्रसंचालन म्हस्के एम बी आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर शेटे यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post