६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पटकावले विजेतेपद


बीड : - मध्यप्रदेश राज्य शासन व शालेय शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय क्रमांकासह सर्वसाधारण विजेतेपद पटकावला आहे अशी माहिती तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी दिली आहे. 
       देवास, मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई या अधिकृत संघटनेचे हे सर्व पदक विजेते खेळाडू आहेत. स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे 
१९ वर्षे मुले -१) ४५ किलो- दानिश तडवी ( रौप्यपदक ), (२) ४८ किलो - ओम बोरसे ( सुवर्णपदक ) (३) ५१ किलो - संस्कार अवताडे ( रौप्यपदक ) (४) ५५ किलो- आर्यन राऊत ( रौप्यपदक ) 
 १९ वर्षे मुली - १) ४६ किलो - तनिष्का काळे ( सुवर्णपदक ) (२) ५५ किलो - गौरी चिंदरकर ( कांस्यपदक ) (३) ५९ किलो - श्रद्धा वाल्हेकर ( कांस्यपदक) (४) ६८ किलो- सिद्धी बेडांळे ( सुवर्णपदक) 
       सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, उपाध्यक्ष श्री निरज बोरसे, श्री दुलीचंद मेश्राम, श्री छत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे , महासचिव श्री मिलिंद पठारे, सचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री व्यंकटेश कररा, सदस्य श्री अजित घारगे, श्री सतिष खेमसकर आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश खोमणे, नम्रता तायडे तर व्यवस्थापक म्हणून रविराज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post